27 February 2021

News Flash

भारतीय देवतांना कॉपी करणं कार्डीला पडलं भारी; ‘त्या’ फोटोशूटमुळे मागावी लागली माफी

ते फोटो पाहून भारतीय संतापले; अखेर गायिकेने मागितली माफी

प्रसिद्ध गायिका कार्डी बी आपल्या वादग्रस्त विधानं व विचित्र फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा या फोटोंमुळे तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रक्रार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी कार्डीने भारतीय देवतांच्या शैलीत एक फोटोशूट केलं होतं. मात्र हे फोटोज भारतीय प्रेक्षकांना आवडले नाहीत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे कार्डीवर जोरदार टीका केली. परिणामी वाढत्या टीकेमुळे तिने भारतीयांची माफी मागितली आहे.

अवश्य पाहा – याला म्हणतात खरा सुपरस्टार; चित्रपटातून केलं बाहेर पण एका सीनसाठी घेतले ७४ कोटी

कार्डीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्या पाठीमागे अनेक हात दाखवण्यात आले आहेत. तसेच तिच्या हातात एक शूज देखील आहे. या फोटोच्या माध्यमातून भारतीय देवतांचा अपमान केला जातोय, अशी टीका काही नेटकरी करत आहेत. अखेर संतापलेल्या टीकाकारांना शांत करण्यासाठी कार्डीने भारतीयांची माफी मागितली आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

“कुठल्याही धर्माचा किंवा संस्कृतीचा अपमान करण्याच्या उद्देशाने हे फोटोशूट केलेलं नाही. तरी देखील आमच्या या फोटोमुळे काही जणांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. यासाठी मी माझ्या संपूर्ण टीमच्या वतीने माफी मागते. यानंतर पुन्हा अशी चूक होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.” अशा आशयाचा व्हिडीओ पोस्ट करुन कार्डीने भारतीयांची माफी मागितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 11:44 am

Web Title: cardi b apologises for goddess durga look on magazine cover mppg 94
Next Stories
1 नागा साधूंना अटक झाली पाहिजे म्हणणाऱ्या पूजा बेदीला कुंभमेळ्याचं आमंत्रण
2 अविका गौरने दिली प्रेमाची कबुली; करते ‘या’ व्यक्तीला डेट
3 KBC 12 : यंदाच्या पर्वात पहिल्या करोडपती होणाऱ्या कोण आहेत नाजिया नसीम ?
Just Now!
X