News Flash

हॉलिवूडच्या रॅपरला टॅटूचं वेड; एक टॅटू काढायला लागले चक्क ६० तास

जाणून घ्या, हा टॅटू काढायला एवढा वेळ का लागला

आजच्या तरुणाईमध्ये टॅटूचं प्रचंड क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये कलाकारही मागे नाहीत. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक कालाकारांना टॅटूची आवड असून त्यांनी वेगवेगळ्या डिझाइनचे टॅटू आपल्या शरीरावर गोंदवून घेतले आहेत. यामध्ये सध्या हॉलिवूडची लोकप्रिय रॅपर कार्डी बी हिच्या टॅटूची चर्चा रंगली आहे. कार्डी बी ला टॅटू काढण्याची प्रचंड आवड असल्याचं या टॅटूवरुन दिसत आहे. मात्र खरी चर्चा रंगली आहे, ते हा टॅटू काढण्यासाठी लागलेल्या वेळेची. हा टॅटू  काढण्यासाठी एक किंवा दोन तास लागले नसून तब्बल ६० तासांपेक्षा जास्त वेळ लागल्याचं सांगण्यात येत आहे.

कार्डी बी ही हॉलिवूडमधील लोकप्रिय रॅपर असून बऱ्याच वेळा ती तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती टॅटूमुळे चर्चेत आली आहे. कार्डीने पाठीपासून ते मांडीपर्यंत एक मोठा टॅटू काढला आहे. हा टॅटू काढण्यासाठी टॅटू आर्टिस्टला जवळपास काही महिने खर्च करावे लागले आहेत.

कार्डीने इन्स्टाग्रामवर या टॅटूचा एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला असून तिने संपूर्ण टॅटू नेमका कसा आहे हे दाखविलं आहे. तसंच तिने कॅप्शनमध्ये टॅटू आर्टिसचे आभारही मानले आहेत. ”तर हे आहे ते! मला हा टॅटू काढण्यासाठी बरेच महिने लागले. मात्र अखेर तो पूर्ण झाला. हा माझ्या पाठीवर काढण्यात आलेला टॅटू आहे. माझ्या पाठीवरुन सुरु केलेला हा टॅटू माझ्या पायापर्यंत आहे. धन्यवाद जेमी स्चेन”, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.


दरम्यान, या टॅटूमध्ये कार्डीने निर्सगातील काही गोष्टींचा समावेश केला आहे. यात फुलं, पानं, फुलपाखरु यांचा समावेश आहे. हा टॅटू काढण्यासाठी जेमी स्चेनला जवळपास ६० तासांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे. जेमीनेत्याच्या इन्स्टापेजवर या टॅटूचा व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 3:23 pm

Web Title: cardi b made beautiful tattoos on her back ssj 93
Next Stories
1 सलमान विकणार ‘फ्रेश’ सॅनिटायझर; फॉर्म हाऊसवरुनच केली नव्या ब्रॅण्डची घोषणा
2 “माझा फोटो कुख्यात गुंडासोबत दाखवला कसा?”; ‘पाताल लोक’ पाहून भाजपा आमदार संतापला
3 देवोलिनाला बसला ट्रोल करण्याचा फटका; अभिनेत्याने केला सायबर क्राइमचा आरोप
Just Now!
X