News Flash

‘बिग बॉस१४’मध्ये सहभागी होण्यावर कॅरीमिनाटी म्हणाला..

जाणून घ्या काय म्हणाला..

सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. लवकरच अभिनेता सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच यूट्यूबर कॅरी मीनाटी बिग बॉस १४मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

नुकताच कॅरी मिनाटीने ट्विट करत तो बिग बॉस १४मध्ये सहभागी होणार की नाही यावर वक्तव्य केले आहे. ‘मी बिग बॉसमध्ये सहभागी होणार नाही. तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटेल आहे.

कॅरी मिनाटीची ही पोस्टपाहून भुवन बामने देखील ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये ‘तू पुढच्या वर्षीपण बिग बॉसमध्ये जाणार. जसं मी गेली ४ वर्षे जात आहे’ असे म्हटले आहे.

पाहा : ‘बिग बॉस १४’मध्ये होणार कॅरी मिनाटीची एण्ट्री? सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

काल बिग बॉस १४मध्ये कॅरी मिनाटी सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच तो १४ दिवस क्वारंटाइन राहण्यासाठी मुंबईमधील एका हॉटेलमध्ये असल्याचे देखील म्हटले जात होते. सोशल मीडियावर कॅरीमिनाटी हा हॅशटॅग देखील ट्रेंड होत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 4:25 pm

Web Title: carry minati on participating in big boss 14 avb 95
Next Stories
1 “मुलांसाठी थाळ्या सजवतात अन् आम्हाला फेकलेले तुकडे देतात”
2 “उर्मिला मला प्रॉस्टिट्युट म्हणाली तेव्हा फेमिनिझम कुठे गेला होता?” कंगनाचा सवाल
3 “अस्वच्छ थाळी स्वच्छ करतोय”; जया बच्चन यांच्यावर भोजपुरी अभिनेत्रीची टीका
Just Now!
X