देशात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तसेच मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. शिवाय नागरिकांकडून या नियमांचे आणि सूचनांचे पालन होतय की नाही? हे पाहण्यासाठी पोलीस डोळ्यात अंजन घालून गस्त घालत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता जिम्मी शेरगिल आणि दिग्दर्शक इश्वर निवास यांच्यासोबत ३५ लोकांवर करोनाच्या सूचनांच पालन न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता अभिनेत्री उपासना सिंह विरोधात गुन्हा दाखव करण्यात आला आहे.

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमध्ये ‘बुआ’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री उपासना सिंह पंजाबमधील कस्बे मोरिडा परिसरात एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते चित्रीकरण सुरु असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर उपासना यांना काही प्रश्न विचारण्यात आले. पण उपासना यांनी मौन बाळगले. त्यानंतर उपासना यांच्या विरोधात मोरिंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

आणखी वाचा : ‘ये जादू है जिन का’मधील अभिनेता अडकला लग्नबंधनात

पंजाबमध्ये १५ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी रोज संध्याकाळी ६ ते पहाटे ५ पर्यंत लॉकडाउन जाहिर केला. नागरिकांना घरातच राहण्याचं आणि अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आले होते. पण अनेकांनी सूचनांचे पालन न करता लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. उपासना सिंह यांच्यापूर्वी जिमी शेरगिल पंजांबमध्ये ‘युअर ऑनर 2’ या वेब सीरिजचं शूटिंग करत असताना सेटवर शंबर लोक उपस्थित असल्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. करोनाच्या नियमावलीचं पालन न केल्याने जिमि शेरगिलसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.