11 July 2020

News Flash

गणेश आचार्यनंतर आणखी एका बॉलिवूड कलाकारावर विनयभंगाचा गुन्हा

त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बॉलिवूड कलाकारांवर होणारे लैगिंक शोषणाचे आरोप आता नवीन राहिलेले नाही. #Metoo चळवळीनंतर तर अनेक महिला कलाकारांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारावर मौन सोडलं. त्यानंतरही अनेक घटना घडत आहे. अलिकडेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यावर अश्लील व्हिडीओ बघण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पुन्हा एक घटना समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर गणेश आचार्यवर एका महिला नृत्य दिग्दर्शिकेने अश्लील व्हिडीओ बघण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप केला होता. आता आणखी एका बॉलिवूड कलाकावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. या अभिनेत्याचे नाव शाहबाज खान आहे. त्याच्यावर विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बाबत एएनआयने ट्विट वृत्त दिले आहे. मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘राम सिया के लव कुश’,‘कर्मफलदाता शनी’, ‘चंद्रकांता’, ‘युग’ ‘फीर लौट आयी नागिन’, ‘दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली’, ‘अफसर बिटिया’, या हिंदी मालिकांमध्ये शाहबाजने काम केले आहे. शिवाय त्याने अमिताभ यांच्या ‘मेजर साहब’, सनी देओलच्या ‘द हिरो -लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ आणि सैफच्या ‘एजंट विनोद’ चित्रपटात काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 2:34 pm

Web Title: case of molestation filed against actor shahbaz khan avb 95
Next Stories
1 सारा-कार्तिकच्या इंटिमेट सीनवर सेन्सॉर बोर्डाची कात्री; व्हिडीओ मात्र चर्चेत
2 ‘सकारात्मक राहण्याशिवाय काहीच पर्याय नाही’; कर्करोगाशी झुंज देणाऱ्या इरफानचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
3 ऑस्कर विजेत्या ‘पॅरासाइट’ची कथा तामिळ चित्रपटातून चोरल्याचा नेटकऱ्यांचा आरोप
Just Now!
X