News Flash

न्यूड फोटोशूटप्रकरणी मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल

गोव्यात दाखल करण्यात आली तक्रार

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अश्लिल व्हिडीओ चित्रीत केल्याप्रकरणी पूनम पांडेला अटक करण्यात आली होती. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद सोमणविरोधात गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिलिंद सोमणनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक धावत असतानाचा एक न्यूड फोटो शेअर केला होता. याविरोधात आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम २९४ आणि सेक्शन ६७ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिलिंद सोमणचा हा फोटो समोर आल्यानंतर गोव्यातील राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली.

 

View this post on Instagram

 

Happy birthday to me ! . . . #55 @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

आणखी वाचा- मिलिंद सोमणने शेअर केला न्यूड फोटो, म्हणाला…

‘मिलिंद सोमणनं सोशल मीडियावर न्यूड फोटो अपलोड केल्यामुळे गोव्याच्या प्रतीमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे,’ असं म्हणत गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ४ नोव्हेंबर रोजी आपल्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो न्यूड होऊन धावताना दिसला होता. या फोटोसह त्यानं ‘हॅपी बर्थ डे टू मी’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. यापूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्याविरोधात अश्लिल व्हिडीओचं चित्रीकरण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तिला आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 8:43 am

Web Title: case registered against model actor fitness promoter milind soman social media post where he was seen sprinting naked at a goa beach jud 87
Next Stories
1 VIDEO: “मी देशवासीयांना प्रेरित करणार”; बॉलिवूड अभिनेत्यानं करोनावर लिहिलं पुस्तक
2 शाहरुखच्या चित्रपटात सलमानची एण्ट्री; नव्या अ‍ॅक्शनपटात करणार स्क्रीन शेअर
3 गौरी खानने शेअर केला थ्रोबॅक फोटो ; म्हणाली…
Just Now!
X