18 September 2020

News Flash

VIDEO: कास्टिंग काउच विथ प्रिया बापट

चक्क प्रियाच स्वतःहून त्यांच्या चित्रपटात काम करायला तयार आहे

अखिल भारतीय डिजीटल पार्टीच्या कास्टिंग काउच विथ अमेय अॅण्ड निपुण या वेब मालिकेचा पाचवा एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे. यंदाच्या एपिसोडमध्ये टाइमपास २, काकस्पर्श, टाइम प्लीज यांसारखे दर्जेदार चित्रपट देणारी अभिनेत्री प्रिया बापट हिने उपस्थिती लावली.
आपल्या नेहमीच्या शैलीत अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारीने या एपिसोडचीही सुरुवात केलेली यात दिसते. प्रियाने उमेश कामत या अभिनेत्यासोबत लग्न केलेले आहे. त्याच्या कामत या आडनावाला निशाणा करून या दोघांनी वेब एपिसोडची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अमेय आणि निपुण येणाऱ्या प्रत्येक अतिथीला आपल्या चित्रपटात काम करणार का विचारतात. मात्र यावेळी उलटच घडलेय. चक्क प्रियाच स्वतःहून त्यांच्या चित्रपटात काम करायला तयार आहे असे सांगते. पण यावेळी अमेय आणि निपुण तिला टाळताना दिसतात, यामागचे नेमके कारण काय आहे ? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 4:32 pm

Web Title: casting couch with amey nipun with priya bapat
Next Stories
1 परिणितीसोबत सुशांतचा ‘ताकडम’
2 बक-याची कत्तल म्हणजे ‘कुर्बानी’ नाही- इरफान खान
3 शाहरुख-सलमानची सायकल स्वारी
Just Now!
X