04 March 2021

News Flash

सुशांत प्रकरणाची चौकशी CBI थांबवणार नाही; कारण…

"त्या प्रश्नांची उत्तर अद्याप मिळाली नाहीत"; सुशांत प्रकरणाची चौकशी थांबवण्यास CBI चा नकार

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर सुशांत प्रकरणाची चौकशी आता बंद होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु ही शक्यता सीबीआयने फेटाळून लावली आहे. सीबीआयचे प्रवक्ता आर. के. गौर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सुशांत प्रकरणाची चौकशी सुरुच राहील अशी माहिती दिली.

अवश्य पाहा – ‘रामायणात १४ वर्षांचा वनवास होतो अन् करोनात…’; अभिनेत्रीने मानले BMC चे आभार

एम्स रुग्णालयामधील टीमने दिलेल्या रिपोर्टनुसार सुशांतच्या हत्येचा दावा फेटाळण्यात आला. परंतु या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तर अद्याप सीबीआयला मिळालेली नाहीत. शिवाय सुशांत आत्महत्येसाठी प्रवृत्त का झाला होता? याचंही कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे अनुत्तरीत प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय हे प्रकरण बंद होणार नाही असं स्पष्टीकरण आर. के. गौर यांनी दिलं. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे सुशांतच्या चाहत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

अवश्य पाहा – बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; पूजा भट्टने देशवासीयांना केली मदतीची विनंती

एम्स रुग्णालयाकडून सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 7:37 pm

Web Title: cbi investigation sushant singh rajput death case mppg 94
Next Stories
1 प्रेग्नंसी दरम्यान करीनाने पूर्ण केलं ‘लालसिंग चड्ढा’चे चित्रीकरण
2 भानु अथ्थैया यांनी परत केला होता भारताचा ‘पहिला ऑस्कर’; कारण…
3 भारतासाठी पहिला ऑस्कर पटकावणाऱ्या भानु अथैया यांचं निधन
Just Now!
X