31 October 2020

News Flash

कंगना रनौत अडचणीत; ह्रतिकच्या मोबाईल कॉल्सवर होती नजर, पोलिसांच्या तपासात खुलासा

अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा पोलिसांच्या रडारवर

संग्रहित छायाचित्र

ठाण्यातील बेकायदा कॉल तपशिल (सीडीआर) प्रकरणात आता अभिनेत्री कंगना रनौतचे नावही समोर आले आहे. कंगनाने अभिनेता हृतिक रोशनचे सीडीआर बेकायदेशीररित्या खासगी गुप्तहेरामार्फत मिळवल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. यामुळे कंगना अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

बेकायदा मोबाइल कॉल तपशील मिळवून दिल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने तीन दिवसांपूर्वी वकील रिजवान सिद्दिकी याला अटक केली होती. त्याने बेकायदा सीडीआर मिळवून किती लोकांना पुरवले याची चौकशी पोलीस करत आहे. रिझवानच्या चौकशीतून जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा तसेच कंगनाचे नावही समोर आले आहे.

कंगनाने हृतिक रोशनचे सीडीआर बेकायदेशीररित्या खासगी गुप्तहेरामार्फत मिळवले होते. तिने ह्रतिकचा मोबाईल नंबर वकील रिजवान सिद्दीकीला दिल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. पोलीस अधिक चौकशी करत असल्याचेही ते म्हणालेत.

सीडीआर प्रकरणात अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफचेही नावही समोर येत आहे. आयेशा श्रॉफ आणि अभिनेता साहिल खान हे दोघे व्यावसायिक भागीदार आहेत. त्यांच्यात वाद झाल्याने आयेशाने साहिलचे बेकायदेशीररित्या सीडीआर मिळविले होते. ते सीडीआर आयेशाने वकील रिजवान सिद्दीकीला पुरवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयेशा श्रॉफला चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती त्रिमुखे यांनी दिली. सीडीआर प्रकरणात सिनेसृष्टीतील कलावंताचे नाव समोर येत असून चौकशीनंतरच या कलाकार मंडळींनी हे सीडीआर का मिळवले, हे स्पष्ट होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2018 3:50 am

Web Title: cdr case kangana ranaut had shared hrithik roshans to rizwan siddiqui thane police begin probe
Next Stories
1 तापाने फणफणणाऱ्या बालिकेवर लोखंडी सळीने उपचाराचा प्रयत्न
2 बालकांवर लैंगिक अत्याचाराची २०१६ मध्ये लाखावर प्रकरणे
3 ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याखाली सरसकट अटक नको
Just Now!
X