News Flash

कल्याणमध्ये सूर आणि रोषणाईचा उत्सव

कल्याणमध्ये नवीन गृहसंकुले उभी राहत असतानाच नागरिकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने एखादा स्तुत्य उपक्रम होणे महत्त्वाचे ठरते.

(संग्रहित छायाचित्र)

रौनक सिटी आणि ‘लोकसत्ता’ आयोजित ‘इगनाइट’ महोत्सव

ठाण्याच्या पलीकडे झपाटय़ाने विकसित होत असलेले नवनगर म्हणून नावारूपास येत असलेला कल्याण परिसर यंदाच्या दिवाळीत सूर, नृत्य आणि रोषणाईने उजळून निघणार आहे. बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या रौनक सिटी आणि लोकसत्ता आयोजित ‘इगनाइट’ हा सूर आणि रोषणाईचा संगम असलेला भव्य महोत्सव रौनक सिटी येथे ५ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांच्यासह नामवंत कलावंतांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या या उत्सवात खाद्यमहोत्सव आणि इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

कल्याणमध्ये नवीन गृहसंकुले उभी राहत असतानाच नागरिकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने एखादा स्तुत्य उपक्रम होणे महत्त्वाचे ठरते. याच उद्देशातून दिवाळीच्या औचित्याने एकाच प्रांगणात उपस्थितांना सूर, नृत्य आणि रोषणाईने परिपूर्ण असलेला महोत्सव अनुभवता यावा यासाठी रौनक ग्रुपच्या माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवे आणि रोषणाईचा अनोखा मिलाफ या महोत्सवात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याबरोबरच कॉमेडी शो, अनप्लग्ड बँड, चित्रपट, विविध खेळ, चित्रकला स्पर्धा, कराओके यासारख्या आकर्षक उपक्रमांत सहभागी होण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळणार आहे. प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी, जयदीप बगवाडकर, शमिका भिडे, अक्षता सावंत या सुरेल कलाकारांची गाणी महोत्सवाते  सादर होणार असल्याने सूर आणि आकर्षक रोषणाईचा अनोखा मिलाफ श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. याशिवाय आपल्या विनोदाने हास्याची मैफल रंगवणारे जॉनी रावत यांचा कॉमेडी शो महोत्सवात सादर होणार आहे. मराठी बिग बॉस विजेती मेघा धाडे हिचा नृत्याविष्कार सादर होतानाच काही नृत्य समूह त्यांची कला सादर करणार आहेत. या महोत्सवात खाद्यपदार्थाचे स्टॉल्स ठेवण्यात येणार आहेत. मिसळ महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारची मिसळ ठेवण्यात येणार आहे. या महोत्सवाचे निवेदन समीरा गुजर करणार आहे.

कल्याणमध्ये नव्याने वसणाऱ्या गृहसंकुलांमध्ये मराठी भाषिक नागरिक मोठय़ा प्रमाणात राहतात. दिवाळी सणात बाहेरगावी जाण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या परिसरात मनोरंजनाची माध्यमे नागरिकांना आवश्यक असतात. रौनक सिटीमध्ये दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने मोठी रोषणाई करण्यात येते. यंदा या आकर्षक रोषणाईबरोबरच नागरिकांना संगीत, नृत्य, कॉमेडी शो अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहता येणार आहे, असे रौनक ग्रुपचे संचालक राजन बांडेलकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2018 12:04 am

Web Title: celebration of tune and light in kalyan
Next Stories
1 ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
2 ठाण्यात रस्त्यांवर दिवाळी बाजार
3 खाडीकिनारी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन
Just Now!
X