News Flash

Video: सेलिब्रिटींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, म्हणाले…

भारतासह संपूर्ण जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

भारतासह संपूर्ण जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सेलिब्रिटी मंडळीही या सेलिब्रेशनमध्ये मागे नव्हते. अभिनेता सैफ अली खान व करीना कपूर चक्क स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्ष साजरे करत आहेत. दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सैफ अली खान व करीना कपूर यांच्यासोबत भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली, अभिनेत्री अनुष्का शर्मा, अभिनेता वरुण धवन व त्याची प्रेयसी नाताशा दलाल दिसत आहेत. या व्हिडीओ मार्फत त्यांनी सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वरुण धवनच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर हा व्हिडीओ सर्वात आधी पोस्ट करण्यात आला. काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओमार्फत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 12:08 pm

Web Title: celebrities celebrating new year 2020 mppg 94
Next Stories
1 BIRTHDAY SPECIAL : कर्करोगावरही मात करणाऱ्या सोनालीचा प्रेरणादायी प्रवास
2 नाना पाटेकर एकेकाळी दिवसाला ओढायचे आठ सिगारेट
3 …तरच मी अवॉर्ड शोला हजर राहिल; रोहित शेट्टीची अशीही अट
Just Now!
X