News Flash

दिवाळी विशेष : माझा वाढदिवस लक्ष्मीपूजनाचा!

माझा वाढदिवसच २३ ऑक्टोबरचा, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचा. त्यामुळे मला दिवाळी आणि वाढदिवस असे दोन्ही एकाच दिवशी साजरा करण्याचा योग येतो.

| October 23, 2014 10:52 am

सिध्दार्थ जाधव
दिवाळीशी माझे नाते अगदी जन्मजात आहे असेच म्हणाला हवे. कारण माझा वाढदिवसच २३ ऑक्टोबरचा, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचा. त्यामुळे मला दिवाळी आणि वाढदिवस असे दोन्ही एकाच दिवशी साजरा करण्याचा योग येतो. दोन्हीसाठीच्या शुभेच्छा मला एकाच दिवशी स्वीकारता येतात. एक प्रकारे माझा एकूणच आनंद द्विगुणित करण्याचा योग आहे म्हणा ना! यावर्षीच्या माझ्या दिवाळीचे विशेष म्हणजे माझी अत्यंत महत्वाची भूमिका असणारा ‘रझाकार’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या पूर्णतेच्या घोषणेचा सोहळा शहापूर येथे अभिनेते धर्मेन्द्र यांच्या उपस्थितीत आणि प्रचंड गर्दित पार पडला हे विशेष. माझ्यासाठी हा विशेष असा रोमांचक अनुभव होता. यावर्षीची दिवाळी याच क्षणापासून सुरू झाली असे म्हटले तरी चालेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2014 10:52 am

Web Title: celebrities diwali special siddharth jadhav
Next Stories
1 वाहिन्यांच्या कलाकारांना दिवाळीसाठी घराची ओढ
2 व्हिडिओ : ‘पीके’च्या ट्रेलरमधून अनुष्का सांगतेय आपल्या विचित्र मित्राबद्दल
3 ‘बाजीराव’ची तयारी पाहून दीपिकाही घाबरली
Just Now!
X