News Flash

व्हेंलेटाइन डे

मी व्हेंलेटाइन डे चे मनापासून स्वागत करते, याचा अर्थ मी कोणाच्या प्रेमात आहे अथवा माझ्या कोणी प्रेमात आहे असा घेवू नका.

| February 14, 2014 03:15 am

अतुला दुगए
मी व्हेंलेटाइन डे चे मनापासून स्वागत करते, याचा अर्थ मी कोणाच्या प्रेमात आहे अथवा माझ्या कोणी प्रेमात आहे असा घेवू नका. मनोरंजन उद्योगात वावरताना तसा ‘सुयोग’ येवू शकतो. पण अत्यंत प्रामाणिकपणे सांगायचे तर तशी मनात अजून ‘घंटी’ वाजली नाही, कधी वाजेल ते माहित नाही. पण प्रेमाचा एकच दिवस असतो हे मला मान्य नाही व हे प्रेम म्हणजे ते प्रेम असते असेही मी मानत नाही. माझे माझ्या आई व बहिणीवर नितांत प्रेम आहे. विवध कारणास्तव काही व्यक्ती आवडतात त्यांच्यावरही माझे प्रेम आहे. हे प्रेम म्हणजे जिव्हाळा, आपुलकी व जे फक्त १४ फेब्रुवारी रोजीच करायला हवे असे नाही. तशी मी वर्षभर अनेक प्रकारच्या भेटवस्तू खरेदी करत असते. त्याचाही माझ्याकडे खूप मोठा संग्रह आहे. तूर्त, मी अभिनय वाटचालीवर प्रेम करीत आहे. त्यातून मला ऊर्जा मिळते.

फोटो गॅलरी: व्हेलेंटाइन विशेषः प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी जोड्या

शृजा प्रभूदेसाई
आपल्या जवळच्या माणसाबाबत प्रामाणिकपणे प्रेम व्यक्त करण्याची सोनेरी संधी म्हणजे हा व्हेंलेंटाइन दिवस. पण मला हा दिवस व प्रेम याबाबत अधिक भावना आहे. ती म्हणजे आपल्या माणसाबाबत आपल्याला कोणत्याही क्षणी प्रेम वाटायला हवे, आपण त्या व्यक्तीचे हितचिंतक असायला हवे. आपल्या माणसाबाबतचे प्रेम म्हणजे आपण देखिल फ्रेश होतो, आपल्याही मनाला सुखदता वाटते. सध्या सगळ्याच क्षेत्रात गतिमानता, स्पर्धा, आत्मकेंद्रियता यामुळे प्रेमभावना कमी झाली आहे की काय असा काहीसा प्रश्न पडतो. पण माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त झाला तरी तो प्रेमाची भावना कशी बरी विसरेल.

आदिती भागवत
१४ फेब्रुवारी हा ‘एक दिवस प्रेमाचा’ पुरे हो कसा? आणि तो ही फक्त युवा प्रियकर-प्रेयसीचा? छे, छे मला हे अजिबत मंजूर नाही. ‘प्रेमाचा दिवस व भावना’ ही सतत ‘चोवीस तास’ चालणारी गोष्ट आहे व प्रत्येक नात्यात प्रेम असते….. खरं तर तसे असावे असे मी म्हणेन. आई-मुलगी अथवा पिता व मुलगी, भाऊ-बहिण, गुरु-शिष्य अशा प्रत्येक नात्यात सतत प्रेम झिरपत असते. त्यामुळे १४ फेब्रुवारी या एकाच दिवशी प्रेम करावे असे काही नाही. पण नेमक्या त्याच दिवसाची जणू ती गरज आहे, असे मानत काही उत्साही प्रेमिक गैरफायदा उठवत असतील. खरं तर आज समाजात विविध प्रकारचे तणाव, द्वेषभावना, स्वार्थ वगैरै इतक्या प्रमाणात वाढले आहेत की त्यांना रोखण्याचा एक मार्ग प्रेम असू शकतो. पण छोट्या-छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण करून घेणे, इगो दुखावणे याची खरचं काही गरज आहे का सांगा? म्हणून मग फादर डे, मदर डे, व्हेंलेंटाइन डे असे प्रकार जन्माला येतात.

परिणिती चोप्रा
माझे पहिले प्रेम ‘माझे चित्रपट’ व त्यातील माझ्या भूमिका हे आहे. व्हेंलेंटाइन डे म्हणजे फक्त प्रियकराला प्रेम व्यक्त करण्याचा ‘अधिकार’ देण्याची सुवर्णसंधी नव्हे. विदेशातून आलेले हे ‘फॅड’ आपल्याकडे सहज रुजलय, कारण ई-कॉमर्स युगात, ट्विटर-फेसबुकच्या काळात आता ‘उत्सवां’ना भाषा, प्रदेश, देश यांच्या काहीही मर्यादा नाहीत. म्हणूनच तर या भावसंस्कृतीचा आपण स्वीकार करायला हवा. मी सध्या ‘इश्कजादे’ पासूनच्या माझ्या रुपेरी वाटचालीवर फोकस ठेवून आहे. ‘हँसी तो फँसी’ हा माझ्या कारकिर्दीतला चौथा चित्रपट रसिकांपर्यंत पोहचला आहे. त्यात प्रेमातील युवा मस्तीचा वेगळा भावी आविष्कार साकारला आहे. माझ्या चाहत्यांसाठी हा चित्रपट व्हेंलेंटाइन भेट ठरावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 3:15 am

Web Title: celebrities thoughts about valentines day
टॅग : Valentines Day
Next Stories
1 गोविंदाच्या ‘ना हिरे नु सता’ या म्युझिक अल्बमचे लाँचिंग
2 सलमाची ‘जय हो’ सहकलाकार डेझी शहावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा?
3 ‘मॅड इन इंडिया’त सिद्धार्थचा मराठी तडका!
Just Now!
X