आपल्या लग्नाच्या दिवशी कोणतीही कसर शिल्लक न ठेवता सुंदर दिसण्याचा प्रत्येक नववधूचा मानस असतो. त्यातही ती नववधू ‘सेलिब्रिटी ब्राईड’ असेल तर मग अनेकांच्या अपेक्षाही जास्त असतात. अशीच एक सेलिब्रिटी ब्राईड नुकतीच चाहत्यांच्या भेटीला आली आणि अनेकांच्याच मनावर राज्य करुन गेली. ती नववधू म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा. विराट कोहलीसोबत विवाहबंधनात अडकलेली अनुष्का तिच्या लग्नाच्या लेहंग्यामुळेसुद्धा बरीच चर्चेत आली. या विवाहसोहळ्यात सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने त्यांचे कपडे डिझाइन केले होते.

अनुष्काच्या या वेडिंग लूकमध्ये तिच्या केशभूषेपासून ते अगदी इमिटेशन ज्वेलरीपर्यंत साऱ्याचीच चर्चा पाहायला मिळाली. पण, यातही तिच्या कानातल्या झुमक्यांविषयीच्या वेगळ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. अनुष्काने लग्नाच्या दिवशी घातलेले झुमके तिच्या लूकला अगदी शोभून दिसत होते. पण, तिने घातलेल्या २२ कॅरेट सोन्याच्या त्या झुमक्यांसारखेच हुबेहूब झुमके याआधीही एका अभिनेत्रीने घातले होते. ती अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण.

वाचा : विराटआधीही हे क्रिकेटर होते अभिनेत्रींच्या प्रेमात

दीपिका पदुकोणने ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या ‘जिओ मराठी फिल्मफेअर अवॉर्डस्’मध्ये असेच झुमके घातले होते. फ्लोरल डिझाईन असलेल्या साडीला आणखीनच उठावदार करण्यासाठी तिने हे झुमके घातले होते. इतकेच नव्हे तर अनुष्काचा हा वेडिंग लूक ‘पद्मावती’च्या लूकपासून बराच प्रेरित असल्याचेही म्हटले जात असून सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे.

https://www.instagram.com/p/BckvlPGFPVa/