News Flash

‘हे’ कपल दिसणार बिग बॉस १४मध्ये?

३ ऑक्टोबरपासून बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता लवकरच बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो बिग बॉस १४, ३ ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता एक लोकप्रिय कपल या शोमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कपल रुबिना दिलाइक आणि अभिनव कोहली बिग बॉस १४मध्ये सहभागी होणार आहेत. रुबिना शक्ती अस्तित्व के एहसासकी या मालिकेत भूमिका साकारत होती. तर अभिनव सिलसिला बदलते रिश्तोंका या मालिकेत काम करताना दिसत होता.

 

View this post on Instagram

 

ni tera Appy Bday hai……. @srishtyrode24

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik) on

‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉस १४मध्ये नैना सिंह, जस्मिन भसीन, करण पटेल, निशांत मलकानी, एजाज खान, राहुल वैद्य, सारा गुरपाल, शगुन पांडे, प्रतीक सेजलपाल आणि जान कुमार सानू हे कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच ‘बिग बॉस १४’ ३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 6:19 pm

Web Title: celebrity couple rubina dilaik and abhinav kohli to be the participant in bigg boss 14 avb 95
Next Stories
1 “अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन”; पायल घोषने दिली धमकी
2 Video: नेहा कक्कर आणि बदशाहचे नवे गाणे प्रदर्शित
3 ‘त्या’ व्हिडीओबद्दल कोरिओग्राफर टेरेन्सची बाजू घेत नोराने नेटकऱ्यांना सुनावले
Just Now!
X