News Flash

सेलिब्रिटी क्रश : तो मला ‘भयंकर’ आवडायचा

बाजीराव मस्तानी चित्रपटात अनुजाने बाजीराव पेशवे यांची बहिण भिऊबाईची भूमिका साकारली होती.

अनुजा साठे

‘अग्निहोत्र’, ‘लगोरी’ ह्या टिव्ही मालिकांमधून आणि बॉलीवूडमधील हिट चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ ह्या चित्रपटातून अभिनेत्री अनुजा साठेने आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर ती गेल्याच वर्षी ‘तमन्ना’ या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली. बाजीराव मस्तानी चित्रपटात अनुजाने बाजीराव पेशवे यांची बहिण भिऊबाईची भूमिका साकारली होती. रणवीर सिंग हा त्यात बाजीराव पेशवे यांच्या भूमिकेत होता. ‘मांडला दोन घडीचा डाव’, ‘अग्निहोत्र’, ‘सुवासिनी’ अशा काही मालिकांमध्येही तिने तिच्या अभिनयाची चमक दाखवून दिली. आज आपण या अभिनेत्रीच्या क्रशबद्दल जाणून घेणार आहोत.

मी त्याला प्रत्यक्षात भेटले नाही. पण, माझा लहानपणापासूनचा क्रश हा शाहरुख खान आहे. तो मला खूप भयंकर आवडतो, माझा दुसरा क्रश म्हणजे टॉम क्रूझ. लहानपणापासूनच मला हे दोन्ही अभिनेते आवडतात. पण केवळ ते अभिनेते आहेत म्हणून नाही तर अगदी मनापासून ते मला आवडतात. शाळेत असताना मी माझ्या स्वतःच्या रुममध्ये टॉम क्रझूची साधारण किंग साइज तीन पोस्टर्स होते. माझ्या भावाने मला दोन वाढदिवसाला सलग दोन वर्ष टॉम क्रूझचे किंग साइज पोस्टर्स गिफ्ट म्हणून दिले होते. कारण मला तो खूप आवडतो. त्याचा टॉपगन चित्रपट आला तेव्हा मी अगदीच लहान होते. तेव्हापासून ते आतापर्यंत माझं त्याच्यावर असलेलं प्रेम जसच्या तसं आहे आणि त्यात काहीच बदल झालेला नाही. शाहरुखच्या बाबतीत असचं होतं. वृत्तपत्र किंवा मासिकांमध्ये आलेले त्याचे फोटोंची कात्रण काढून मी रुममध्ये लावायचे. माझी अख्खीच्या अख्खी रुम टॉम क्रूझ आणि शाहरुखच्या फोटोंनी भरलेली होती. मी साधारण आठवी-नववीत जाईपर्यंत माझ्या रुममध्ये त्यांचे फोटो तसेच लावलेले होते. शाहरुख ‘नोबडी’ पासून ‘समबडी’ बनला. कोणाचाही वरदहस्त नसताना तो इतका मोठा सेलिब्रिटी झाला. त्यामुळेच तो माझ्यासाठी एक आयडल क्रश आहे.

दरम्यान, अनुजा लवकरच सोनी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘पेशवा बाजीराव’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बाजीराव पेशव्यांच्या जीवनावर या मालिकेचे कथानक बेतलेले असून अनुजा या माकिलेद्वारे बाजीराव पेशव्यांच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे आता या नव्या रुपात प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात अनुजा यशस्वी होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 1:05 am

Web Title: celebrity crush actress anuja sathe gokhale madly in crush with shah rukh khan and tom cruise
Next Stories
1 Video: प्रियांका चोप्राच्या ‘बेवॉच’ चित्रपटाचा ‘देसी’ ट्रेलर
2 आखाड्यात दंग करणाऱ्या फातिमाच्या सौंदर्याची जादू
3 अंडरवर्ल्डमधील मंडळींकडून बॉलिवूड कलाकारांचे बारसे
Just Now!
X