News Flash

लॉकडाउनमध्ये बाहेर बिनधास्त फिरतेय ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे.

बॉलिवूडच्या अन्य सेलब्रिटींपेक्षा अभिनेत्री नर्गिस फाख्रीचा क्वारंटाइन लूक थोडा वेगळा आहे. बातमीत एम्बेड केलेल्या तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन तुम्हाला ते लक्षात येईलच. नर्गिस अमेरिकेत लॉस एंजलिसमध्ये वास्तव्याला आहे. मागच्या दोन वर्षांपेक्षा लॉकडाउनच्या या काळात लॉस एंजलिस शहराला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले असा दावा तिने केला आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. मग लॉकडाउनमध्ये नर्गिस बाहेर का फिरतेय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नर्गिस मित्रमंडळींसमवेत व्यायाम आणि फेरफटका मारण्याचा आनंद लुटत आहे. नर्गिस बाहेर फिरत असली तरी, चाहत्यांना तिची काळजी आहे. चाहत्यांना तिला घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे.

‘रॉकस्टार’, ‘मद्रास कॅफे’, ‘अजहर’, ‘हाऊसफुल्ल ३’ या लोकप्रिय चित्रपटात नर्गिसने काम केले आहे. अभिनेत्री नर्गिक फाख्रीचे उदय चोप्रा बरोबर नाव जोडले जात होते. ती अभिनेता उदय चोप्राला डेट करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर ‘स्नूप डॉग’ आणि ‘टायरिस’ या म्युझिक व्हिडिओंचे दिग्दर्शन करणारा अमेरिकन दिग्दर्शक मॅट अलोन्झोला बरोबरही नर्गिसचे नाव जोडले गेले. उंच शिडशिडत बांध्याची नर्गिस अभिनेत्रीबरोबर यशस्वी मॉडेल म्हणूनही ओळखली जाते. वाढत्या वजनावरुनही तिच्यावर टीका झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 4:19 pm

Web Title: celebrity lockdown nargis fakhris in los angels america dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 थेट अंतराळात करणार स्टंटबाजी; अभिनेत्याची नासासोबत तयारी सुरु
2 … म्हणून एकेकाळी मुंबईच्या अंडर-१९ संघातील खेळाडू बनला श्री कृष्णमधील बलराम
3 ‘वाघ’चा स्वॅग; चाहत्यांच्या भेटीसाठी अमेयची भन्नाट आयडिया
Just Now!
X