News Flash

…या कारणामुळे पाहायला मिळणार मीरा- करिनामध्ये स्पर्धा

कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

करिना कपूर, मीरा राजपूत कपूर

बॉलिवूड कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी अनेकांनाच उत्सुकता असते. त्यातही काही कलाकारांच्या आयुष्याविषयी चाहत्यांमध्ये भलतंच कुतूहल पाहायला मिळतं. असंच एक सेलिब्रिटी कपल म्हणजे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर. शाहिद आणि मीरा नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्या मुलीचे म्हणजेच मिशाचे सुरेख फोटो पोस्ट करत असतात. त्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून या सेलिब्रिटी कपलला त्यांची मुलगीच प्रसिद्धी मिळवून देतेय असंच म्हणावं लागेल. येत्या महिन्याभरातच मिशाचा पहिला वाढदिवस असून मीराने आतापासून त्यासाठीची तयारी सुरु केल्याचं वृत्त ‘पिंकविला’ने प्रसिद्ध केलंय.

एका प्रसिद्ध वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार एका ब्रिटीश प्रीस्कूल अॅनिमेटेड सीरिज बनवणाऱ्या कंपनीने मीराला तिच्या मुलीच्या थीम बर्थडे पार्टीसाठी काही कल्पना सुचवल्या आहेत. तेव्हा आता मिशाच्या बर्थडे पार्टीसाठी मीरा कोणती तयारी करते हेच जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?

एकिकडे मिशाच्या वाढदिवसाची तयारी सुरु असतानाच दुसरीकडे करिना कपूरही आतापासूनच तैमुरच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तयारीला लागल्याचं म्हटलं जातंय. डिसेंबर महिन्यात तैमूर एक वर्षाचा होईल. तेव्हा या छोट्या नवाबाच्या वाढदिवसासाठी बेगम करिना ‘थीम पार्टी’चा बेत आखत असल्याचं कळतंय. त्यामुळे आता करिना आणि मीरा यांच्यात एक प्रकारची स्पर्धा असल्याचं वातावरण तयार झालं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शाहिदच्या मुलीची बर्थडे पार्टी आयोजित करण्याची संधी त्या कंपनीला मिळाली तर, त्यांना भारतात पुन्हा प्रसिद्धी मिळवणं शक्य होईल. पण, याची माहिती जेव्हा करिनाला मिळाली तेव्हा लगेचच तिने हीच थीम तैमुरच्या वाढदिवसाला ठेवण्याचं ठरवलं. त्याआधी ती यावर पुनर्विचार करेल’, असंही म्हटलं जातंय. करिना आणि मीरा या दोन्ही सेलिब्रिटी ‘मॉम’ त्यांच्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करताना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. तेव्हा आता यात बाजी कोण मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 7:30 pm

Web Title: celebrity mommies kareena kapoor khan and mira rajput get into a war over a themed birthday party babies taimur and misha
Next Stories
1 वडोदरा न्यायालयाकडून शाहरूखला समन्स
2 IIFA 2017 : आयफाच्या निमित्ताने विराट- अनुष्काचं आऊटिंग
3 ‘बिग बॉस ११’मध्ये होणार ढिंच्याक पूजाची एण्ट्री?
Just Now!
X