प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७४ वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधानामुळे चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता रितेश देशमुखने देखील श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्विटमध्ये साथिया तूने क्या किया? असे म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

करोनाची लागण झाल्यामुळे बालसुब्रमण्यम यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी करोनावर मात केल्याची माहिती त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी दिली होती. मात्र अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली होती.