चित्रपटांवर निर्दयीपणे कात्री चालविणाऱ्या सेन्सॉर बोर्डाविषयी बोलताना चित्रपटातील मुख्यत्वे स्त्री पात्रांना सेन्सॉरचा मार झेलावा लागत असल्याचे मत बंगाली चित्रपटसृष्टीची अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने व्यक्त केले. चित्रपटातील पुरुष व्यक्तिरेखा शिवराळ भाषेचा वापर करते अथवा विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे दर्शविण्यात येते त्यावेळी सेन्सॉर बोर्ड कोणतीही कात्री लावत नाही. परंतु, हिच दृश्ये स्त्री व्यक्तिरेखेत चित्रीत करण्यात आल्यास अशा दृश्यांवर कात्री चालविण्यात येत असल्याचे ती म्हणाली. ‘साहेब बीबी गुलाम’ या तिच्या आगामी चित्रपटावरून सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकामध्ये वाद सुरू आहे. चित्रपटातील बलात्काराचे दृश्य काढून टाकण्यात आल्याविषयी बोलताना समाजात बलात्कारासारख्या घटना घडत नाहीत का? असा प्रश्न स्वस्तिकाने उपस्थित केला. तसेच अशा प्रकारच्या दृष्यांवर कात्री चालविल्याने बलात्कार थांबणार आहेत का? असा प्रश्नदेखील तिने विचारला. या आधीदेखील स्वस्तिकाच्या ‘फॅमिली अल्बम’, ‘टेक वन’ आणि ‘अमी अर अमार गर्लफ्रेंड्स’ चित्रपटांमधील वादग्रस्त दृश्यांवर सेन्सॉरने कात्री चालवली आहे. स्वस्तिकाने ‘उडता पंजाब’ चित्रपटावरून सीबीएफसीचे प्रमुख पहलाज निहलानी यांना त्यांच्या आडमुठ्या वागणुकीवरून लक्ष्य कले. समाजातील वास्तव दर्शविण्यात त्यांना रुची नसल्याची तिने म्हटले.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद