02 March 2021

News Flash

चित्रपटगृह, नाट्यगृहांना केंद्राचा मोठा दिलासा; ५० टक्के प्रवेशांचं बंधन हटवलं

१ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

करोनाच्या संकट काळात गर्दी टाळण्यासाठी विविध गोष्टी आणि सेवांवर घालण्यात आलेले निर्बंध कमी केले जात आहेत. आता हळूहळू गाडी रुळावर येताना दिसत आहे. आनंदाची बातमी म्हणजे गेल्या काही दिवासांपासून चित्रगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेने सुरु होती. पण आता केंद्र सरकारने प्रेक्षकांच्या क्षमतेवर लावण्यात आलेला निर्बंध हटवण्यात आले आहेत. चित्रगृहे, मल्टिप्लेक्स, नाटयगृहांसाठी आता १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. १ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘आता चित्रगृहे, मल्टिप्लेक्स, नाटयगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षक हजर राहू शकतात. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत एसओपी जाहीर करण्यात आला आहे’ असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

एसओपी जाहीर करत निर्देश दिले की, कंटेन्मेंट झोनमध्ये चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी चित्रपटगृहांमध्ये एण्ट्री करण्यापूर्वी प्रेत्येक व्यक्तीचे शरीर तापमान पाहिले जाणार आहे. तसेच चित्रपटगृहामध्ये मास्क लावणे अनिवार्य आहे. सोशल डिस्टंसिंगची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात चित्रगृहे, मल्टिप्लेक्स, नाटय़गृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 11:09 am

Web Title: centre allows full occupancy in cinema halls from february 1 avb 95
Next Stories
1 OTT platforms ला लगाम! केंद्र सरकार लवकरच जाहीर करणार नियमावली
2 अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’मध्ये नव्या कलाकारची एण्ट्री, साकारणार खलनायकाची भूमिका
3 नाट्यरंग : हसता हसवता अंतर्मुख करणारे
Just Now!
X