11 December 2017

News Flash

सर्जाचा चेहराच उलगडणार वाड्यातील रहस्य!

सर्जाला वाड्यातील एका पेटीमध्ये साहेबरावचा फोटो मिळतो.

मुंबई | Updated: October 5, 2017 1:29 PM

सर्जाची भूमिका करत असलेला अक्षर कोठारी या साहेबरावच्या लूकमध्ये अगदीच वेगळा दिसतोय.

‘चाहूल २’ मालिकेमध्ये खरी शांभवी म्हणजेच राणी वाड्यामध्ये पोहचली असून खोटी शांभवी तिला सर्जापासून दूर ठेवण्याचे बरेच प्रयत्न करतेय. सर्जाला सत्य पटवून देण्यात राणीला अजूनही यश मिळाले नाही तसेच त्याला राणी अजूनही शांभवीच्या तावडीतून सोडवू शकलेली नाही. या सगळ्यामध्ये वाड्यात अजून एक विचित्र गोष्ट घडलीय ती म्हणजे सर्जा सारखाच दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा देखील वाड्याशी संबंध आहे हे सर्जाच्या लक्षात आले. या व्यक्तीचे नाव साहेबराव आहे.

वाचा : एकूणच सध्याची स्थिती ‘थापाड्या’साठी योग्य – अजित पवार

साहेबराव हा सुरेखाचा नवरा असून तो वाड्यामधून गायब आहे. सर्जाची भूमिका करत असलेला अक्षर कोठारी या साहेबरावच्या लूकमध्ये अगदीच वेगळा दिसतोय. या लूकमध्ये त्याला पगडी, जॅकेट, कुर्ता, धोतर आणि कपाळावर लाल टिळा लावण्यात आला आहे. त्यामुळे आता तुमचा लाडका सर्जा एका नव्या लूक आणि भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा साहेबराव वाड्यातून गायब का झाला? सुरेखा त्याच्या फोनवर काय बोलत असते? आता सर्जाचा चेहराच हे वाड्यातील रहस्य उलगडणार का? अश्या अनेक निरुत्तरीत प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

सर्जाला वाड्यातील एका पेटीमध्ये साहेबरावचा फोटो मिळतो. फोटोतील व्यक्तीचा चेहरा हुबेहूब आपल्यासारखाच असल्याचे पाहून नक्की हा कोण आहे, असा प्रश्न त्याला पडतो. साहेबराव आणि सर्जा यांच्या राहणीमानात, त्यांच्या कपड्यात आणि बोलण्याच्या पद्धतीत फरक असला तरी या दोघांचे चेहरे मात्र सारखेच आहेत. हा साहेबराव सुरेखाचा नवरा असल्याचा सुगावा सर्जाला भायजोच्या बोलण्यातून लागतो. यानंतर साहेबराव वाड्यामध्ये का राहत नाही? सुरेखा काय लपवतेय? हे शोधण्याचा निर्धार सर्जा करतो.

वाचा : ..म्हणून भाऊ कदमचे होतेय कौतुक

वाड्यामध्ये राणी म्हणजेच खऱ्या शांभवीला देखील साहेबरावबद्दल कळल्यावर ती त्याच्याबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सुरेखा ही पहिली पत्नी असतानाही त्याने दुसऱ्या बाईला घरात आणल्याचे शांभवीला यादरम्यान कळते. मात्र, या बाईला त्याने घरात का आणले, याचे उत्तर अजून तिला मिळाले नाही.

First Published on October 5, 2017 1:29 pm

Web Title: chaahool 2 akshay kothari as sahebrao in new look