03 August 2020

News Flash

‘चाची ४२०’मधली बालकलाकार आता आहे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री

कमल हसन आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला ‘चाची ४२०’ त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला होता.

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला ‘चाची ४२०’ साऱ्यांच्याच लक्षात असेल. १९९७ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा चित्रपट त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटामध्ये एका चिमुकलीने कमल हसन आणि तब्बू यांच्या मुलीची भारती रतन ही व्यक्तीरेखा साकारली होती. विशेष म्हणजे ही बालकलाकार दुसरी तिसरी कोणी नसून दंगल गर्ल फातिमा सना शेख आहे.

‘चाची ४२० ‘ हा चित्रपट त्या काळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात तब्बू आणि कमल हसनसोबत फातिमाचीही महत्वाची भूमिका होती. यामध्ये फातिमाने भारती रतन या बालकलाकाराची भूमिका वठविली होती. काही दिवसांपूर्वी  फातिमाने ‘चाची ४२०’ मधला एक फोटो शेअर केला होता. तिच्या या फोटोमुळे फातिमानेच भारती रतनची भूमिका साकारली होती, हे स्पष्ट झालं होतं.

View this post on Instagram

#Throwback #chachi420 @tabutiful

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on

फातिमाने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटामध्ये तिने कुस्तीपटू गीता फोगटची भूमिका साकारली होती. फातिमाच्या करिअरमधील हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर फातिमाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ‘चाची ४२०’ मुळे फेमस झालेल्या फातिमाने बालकलाकार म्हणून अभिनेत्री जुही चावलाच्या ‘वन टू का फोर’, ‘बिट्टू बॉस’ आणि ‘आकाशवाणी’ चित्रपटात देखील काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 4:23 pm

Web Title: chachi 420 child artist is now famous bollywood actress ssv 92
Next Stories
1 हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा – अजय देवगण
2 Photo : चेहरा झाकून व्हिलचेअरवर दिसला इरफान; चाहत्यांमध्ये संभ्रम
3 ‘फत्तेशिकस्त’मुळे ‘गर्ल्स’च्या निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय
Just Now!
X