News Flash

‘दोन मुलांची आई असल्याने मला काम मिळतं नाही..’, अभिनेत्रीने केला खुलासा

चाहतने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

जोहर आणि अमायरा असे चाहतच्या दोन मुलींची नावं आहेत.

‘बडे अछे लगते हैं’ आणि ‘कबूल है’ सारख्या टीव्ही शोमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री चाहत खन्ना सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. चाहत अविवाहित असून तिला २ मुलं आहेत. सध्या तिच्याकडे काम नाही, त्यामुळे चाहतचे हाल होतं आहेत. चाहतकडे फारसे पैसे देखील नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चाहतने हा खुलासा केला आहे.

चाहतने तिच्या फेसबूक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिला खूप कमी काम मिळतं आहे कारण ती दोन मुलांची आई आहे. तिच्याकडे जास्त पैसे देखील नाही,असे चाहत म्हणाली. चाहत पती फरहान मिर्झासोबत राहत नाही आहे. काही वर्षांपूर्वी चाहतने पतीवर जबरदस्ती शारीरिक संबंध आणि अत्याचार केल्याचा आरोप करत तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत त्यांचा घटस्फोट झालेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by CK (@chahattkhanna)

 

View this post on Instagram

 

A post shared by CK (@chahattkhanna)

‘ईटाम्स’ला दिलेल्या मुलाखतीत चाहत म्हणाली, “फरहानकडून तिला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळतं नाही आहे. कारण तो स्वत: त्याचे करिअर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण अजून घटस्फोट झाला नाही आहे, त्यामुळे पोटगी बाबतीत काहीही ठरलेलं नाही.”

आणखी वाचा : चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा; कॅन्सरशी लढा देणारे नट्टू काका झाले भावूक

पुढे चाहतला तिच्या फेसबूक पोस्ट विषयी विचारले तेव्हा ती म्हणाली, “जेव्हा लग्न झालेल्या अभिनेत्रीची निवड करण्याची वेळ येते तेव्हा निर्मात्यांते दोनदा विचार करतात. मी तर जोहर आणि अमायरा या दोन मुलींची आई आहे. मी दुप्पट मेहनत करण्यास तयार आहे. परंतु मला कोणतीही ऑफर मिळत नाही. जेव्हा मी ऑडिशन देते तेव्हा मला नाकारले जाते. नकार देण्याचं कारण म्हणजे त्यांना असे वाटते की मला दोन मुली आहेत, मग ती काम करू शकणार नाही.”

आणखी वाचा : राज- शिल्पाचा अनोखा टायटॅनिक व्हिडीओ

पुढे विवाहीत अभिनेत्रींविषयी काय विचार केला जातो यावर चाहत म्हणाली, त्यांना वाटते की विवाहीत अभिनेत्री मुख्य भूमिकेत चांगल्या दिसणार नाही. “जेव्हा मी माझ्या मुलींबरोबर फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा अनेक लोक मला म्हणतात की मी हे करायला नको. त्यांना वाटते की मी माझ्या मुलींसोबत फोटो शेअर केले तर निर्माते मला कोणत्या प्रोजेक्टसाठी विचारणार नाही. पण मी मुलीं सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, कारण मला वाटतं की मी एक आई आहे आणि मी ते लपवायची आवश्यकता नाही.  तुम्हाला हे स्वीकार करायचं असेल तर करा नाही तर जाऊ द्या. आजकालची कास्टिंग ही इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून होते. मला असे वाटते की एखाद्या कलाकाराला त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइवरून नाही तर त्याच्या योग्यतेनुसार आणि क्षमतेवरून काम मिळायला पाहिजे.”

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

चाहतला आश्चर्य आहे की छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे लग्न झाले आहे आणि त्यांना मुलं ही आहेत, तरी त्यांना काम मिळतं आहे आणि चाहतला नाही. यावर बोलताना चाहत म्हणाली, “बर्‍याच लोकांना असे वाटते की मी उद्योजक झाल्यापासून माझ्याकडे खूप पैसा आहे. हे देखील खरे आहे की आपण वास्तविक जीवनात सोशल मीडियावर जे दिसतो ते आपण नाही आहोत. तुम्ही जे पाहता ते खरं नाही. या साथीच्या आजाराचा माझ्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागत असल्याने मला चांगल काम मिळाव अशी अपेक्षा आहे. निर्माते माझ्या स्वत: च्या कारणांमुळे मला नाकारत आहेत, परंतु जेव्हा मला प्रोजेक्ट मिळत नाही तेव्हा मला खूप काही सहन करावं लागतं.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 4:27 pm

Web Title: chahatt khanna says she is getting no work and left with little money feels sad on being rejected by makers dcp 98
Next Stories
1 ‘मला माझं स्वातंत्र्य परत पाहिजे..’,वडिलांविरुद्ध ‘या’ गायिकेने ठोठावले न्यायालयाचे दरवाजे
2 ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री ईशा आनंद शर्माने केलं सिक्रेट मॅरेज
3 ‘थ्री इडियट्स’ सिनेमानंतर नैराश्यात गेला होता अभिनेता अली फजल; ११ वर्षांनंतर सांगितलं कारण
Just Now!
X