News Flash

“त्यांना आपली जमीन बळकावायची आहे”; अभिनेत्री चीनवर संतापली

करोना विषाणूसाठी चीनच जबाबदार

टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी चाहत करोना विषाणूमुळे चर्चेत आहे. करोना विषाणूच्या वाढत्या फैलावासाठी तिने चीनला जबाबदार ठरवले आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी आपण चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकायला हवा असं मत तिने व्यक्त केलं आहे.

IANS ला दिलेल्या मुलाखतीत तिने चीनबाबत संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली, “करोना विषाणूच्या फैलावासाठी चीन जबाबदार आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी आपण चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकायला हवा. जर १०३ बिलियन भारतीयांनी चिनी वस्तुंऐवजी भारतीय वस्तुंचा वापर केला तर त्यामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसेल. चीन सिमेवरुन आपली जमीन बळकावण्याचे प्रयत्न करत आहे. आपण त्यांना आपली ताकद दाखवायला हवी.” असं मत चाहतने या मुलाखतीत व्यक्त केलं.

कोण आहे चाहत खन्ना?

चाहत खन्ना एक टीव्ही अभिनेत्री आहे. शाका लाका बूम बूम या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिने हिरो, कुम कुम एक प्यारा सा बंधन, बडे अच्छे लगते है, कबूल है यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती गायक मिक सिंगला डेट करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 6:12 pm

Web Title: chahatt khanna urges for the boycott of chinese goods mppg 94
Next Stories
1 “त्या अपघातानंतर माझं करिअर उध्वस्त झालं”; ‘जोश’ फेम अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2 “एका काल्पनिक कथेवर इतका गोंधळ का?”; एकताच्या समर्थनार्थ हिना खान मैदानात
3 रामायणातील सीतेने लहानपणीचा फोटो केला पोस्ट; नेटकरी म्हणाले..
Just Now!
X