News Flash

सुभाष चंद्रा यांचा ZEEच्या चेअरमनपदाचा राजीनामा

एस्सेल समूहावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी चंद्रा यांनी नुकताच झी एंटरटेनमेंटमधील १६.५ टक्के हिस्सा विकण्याच्या निर्णय घेतला होता.

(संग्रहित छायाचित्र)

झी इंटरटेनमेंट इंटरप्रायजेस लिमिटेडचे (ZEEL) प्रवर्तक सुभाष चंद्रा यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. कंपनीने देखील त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. यानंतर चंद्रा आता गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत असतील. तसेच चंद्रा यांच्याकडे आता केवळ कंपनीचे पाच टक्के शेअर्स राहतील.

एस्सेल समूहावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी उद्योजक सुभाष चंद्रा गोयल यांनी नुकताच झी एंटरटेनमेंटमधील १६.५ टक्के हिस्सा विकण्याच्या निर्णय घेतला होता. ही हिस्सेदारी विकल्यानंतर एस्सेल समुहावर ६००० कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक राहिल. झी समूह ९० टीव्ही चॅनेल चालवते. १९९२ मध्ये झीने देशात पहिल्यांदा सॅटेलाईट चॅनेलची सुरुवात केली होती. समूहाने सप्टेंबरमध्ये झी एंटरटेनमेंटमधील ११ टक्के हिस्सा ४,२२४ कोटी रुपयांना इन्व्हेस्को-ऑपेनहायमर या मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक कंपनीला विकला होता.

अंटलांटास्थित इनव्हेस्को झी एंटरटेनमेंटमध्ये २००२ पासून ७.७४ टक्के हिस्सा राखून होती. समूहाने यापूर्वीही माध्यम, मनोरंजन क्षेत्रातील कंपनीतील हिस्सा विक्रीची तयारी यापूर्वीही दर्शविली होती. एस्सेल समूहातील भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांकडून वित्तसंस्था, म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीनंतर वर्ष २०१८ च्या अखेरीस समूहाच्या थकीत कर्जाच्या हप्त्यांच्या परतफेडीतील अपयश एकूणच वित्तीय जगतात चर्चेत आले आहे. एस्सेल समूहाने कर्जाची रक्कम १७,००० वरून कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले. गेल्या काही महिन्यांमध्ये ते ६,००० कोटींवर आले. मात्र ते निर्धारीत कालावधीत शून्यावर आणण्याचे समूहाचे लक्ष्य अद्यापही पूर्ण झालेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 9:02 pm

Web Title: chairman of zee entertainment enterprises limited subhash chandra has resigned from his position aau 85
Next Stories
1 स्फोटके आणून एकाच वेळी सगळयांना संपवा, दिल्ली प्रदूषणावरुन सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं
2 महाराष्ट्रातील राजकारणावरुन लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या दोन खासदारांचे निलंबन
3 पेट्रोलचा दर वर्षातील सर्वोच्च स्तरावर, डिझेलच्या किंमती स्थिर
Just Now!
X