मराठमोळा दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘द डिसायपल’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच घौडदौड केली. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स’ हा पुरस्कार पटकावणाऱ्या या बहुचर्चित सिनेमाची चाहते आतुरतेनं वाट बघत होते. अखेर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘द डिसायपल’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. “माझा चित्रपट संपुर्ण जगभरात दिसेल याबद्दल मी स्वत: ला भाग्यवान मानतो. माझे काम लोकांपर्यंत पोहोचेल याचा मला आनंद आहे. एखादा चित्रपट बनवण्यासाठी खूप संशोधन आणि त्यात सत्यता आणावी लागते. एक निर्माता म्हणून ते करण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझा ‘द डिसायपल’ हा चित्रपट यशस्वीपणे तयार झाल्याने मला आनंद आहे” असे चैतन्यने एका मुलाखतीत सांगितले.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
Loksatta entertainment Murder Mubarak movie released on Netflix channel
अजब व्यक्तिरेखांची गजब जंत्री

पुढे या चित्रपटाबद्दल बोलताना चैतन्य म्हणाला, “या चित्रपटाच्या कथेत असे दिसून येते की कधी कधी आपण सगळ्या नियमांचे पालन करतो, तरीही काहीतरी कमी असल्याचे वाटते. या चित्रपटामुळे मला अल्फांसो क्यूरॉन सारख्या महान व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मिळाली.”

गेल्या वर्षी जेव्हा ‘टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा या चित्रपटाला ‘अ‍ॅम्प्लिफाय व्हॉईसेज पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते आणि, चित्रपटाला नुकताच ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ या प्रकारात ‘स्पिरीट पुरस्कार’ मिळालेला आहे.