महाराष्ट्र दौ-यासाठी चला हवा येऊ द्या ची टीम सांगलीमध्ये पोहचली होती. सांगली येथील पटवर्धन राजे संस्थानाच्या गणपती मंदिरात जाऊन सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी गणरायाचे दर्शन घेतले.
कोल्हापुरातही धम्माल – चला हवा येऊ द्या च्या टीमने कोल्हापुर शहरातही विविध ठिकाणी भेट देऊन एकच धम्माल उडवून दिली. कोल्हापुरमधील महालक्ष्मी मंदिरात अनेक चाहत्यांच्या गराड्यात या टीमने अंबाबाईचे आशीर्वाद घेतले. त्यांनतर रंकाळा तलावावर सर्वांनी बोटींगचाही आनंद लुटला.
कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या या करवीरनगरीत एका कुस्तीच्या आखाड्यालाही भेट दिली. विशेष म्हणजे विनीत बोंडेने कुस्तीच्या आखाड्यात उतरून पहिलवानांशी दोन हातही केले ज्यात त्याला धोबीपछाड मिळाला. ही सगळी धम्माल येत्या २१ आणि २२ डिसेंबरला सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० वा. झी मराठीवरून बघायला मिळणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2015 2:54 pm