News Flash

‘चला हवा येऊद्या’फेम या अभिनेत्याला ओळखलंत का?

या विनोदवीराची लोकप्रियता सातासमुद्रापार पोहोचली आहे

मराठी कलाविश्वामध्ये अनेक विनोदवीर आहेत. मात्र फार कमी जण असे आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर या कलाकारांनी त्यांच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यानंतर आता ‘चला हवा येऊ द्या’मधील भाऊ कदम साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कधी स्त्रीवेशात, कधी लहान मुलांच्या वेशात तर कधी आणखी वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणाऱ्या भाऊ कदमने लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला खळखळून हसवलं. स्टेजवर वावर असलेला हा कलाकार सोशल मीडियावरही सक्रीय असून तो इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो शेअर करत असतो. यामध्येच त्याने त्याच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.

भाऊ कदम बऱ्याचदा त्याच्या जीवनातील फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. यामध्ये त्याने त्याच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भाऊ प्रचंड गोड दिसत असून त्याला ओळखणंही कठीण आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करुन कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

#bhaukadam

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial) on

भाऊ कदम याची लोकप्रियता केवळ देशातच नाही तर सातासमुद्रापार पोहोचली आहे. त्याचे असंख्यं चाहते आहे. भालचंद्र अर्थात भाऊ कदम धमाल विनोदबुद्धी व विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे ओळखला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 1:00 pm

Web Title: chala hawa yeu dya fame actor bhau kadam childhood photo ssj 93
Next Stories
1 ‘अग्गंबाई सासूबाई’मधील प्रज्ञाविषयी तुम्हाला या गोष्टी ठाऊक आहेत का?
2 #MeToo मोहिमेला यश; बलात्कारी निर्मात्याला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
3 ‘नागिन 3’फेम या अभिनेत्रीला सायबर क्राइमचा फटका; २७ हजार रुपये झाले गायब
Just Now!
X