News Flash

सागर कारंडेने तिच्यासाठी लिहिलं खास पत्र!

जाणून घ्या, सागरच्या आयुष्यातील 'ती' आहे तरी कोण?

सागर कारंडे

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मिळणारे मानधन, जीवनशैली याची नेहमीच तुलना व चर्चा होत असते. ‘बॉलिवूड’मधील कलाकार म्हणजे भरपूर ‘ग्लॅमर’, मानधन आणि त्यांच्याकडे असणाऱ्या आलिशान, महागड्या गाड्या असे समीकरण तयार झाले होते. गेल्या काही वर्षांत बॉलिवूडच्या तोडीस तोड ग्लॅमर, पैसा, प्रतिष्ठा मराठी कलाकारांनाही मिळू लागली आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, चित्रपट आणि नाटक या वेगवेगळ्या माध्यमातून मराठी कलाकारांनी मराठीसह हिंदीतही आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. मराठी कलाकार म्हणजे ‘गरीब बिच्चारा’, ‘टॅक्सी किंवा भाड्याची गाडी करुन येणारा’, कमी मानधन मिळणारा, ग्लॅमर नसलेला ही प्रतिमा गेल्या काही वर्षांपासून बदलायला सुरुवात झाली आहे. मराठी कलाकारांकडेही बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच किंवा एक पाऊल पुढे जात आलिशान आणि महागड्या गाड्या आल्या आहेत. ‘मराठी कलाकारांच्या दारी, आलिशान गाड्या भारी’ असे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांकडे स्कोडा, फोर्च्युनर, बीएमडब्ल्यू, मर्सिडिज् अशा गाड्या आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने प्रसिद्धीस आलेला अभिनेता सागर कारंडे यानेही दिवाळीच्या मुहूर्तावर नवी गाडी घेतली.

TOP 10 NEWS : केआरकेने आमिरशी घेतलेल्या पंग्यापासून ते दीपिकाच्या नाराजीपर्यंत सर्वकाही एका क्लिकवर

‘चला हवा येऊ द्या’मध्ये कधी स्त्री तर कधी कवीची भूमिका साकारणारा सागर पोस्टमनच्या भूमिकेत येऊन पत्र वाचतो आणि सर्वांनाच भावूक करून जातो. यावेळी सागरने त्याच्या गाडीसाठी खास पत्र लिहिलं आहे. यात त्याने लिहिलंय की, ‘प्रिय i20, आज तुझी खूप आठवण येतेय ,माझ्या आयुष्यात आलेली तू पहिली, तुझे उपकार कसे मानू तेच कळत नाहीये, आपल्या संपूर्ण प्रवासात खूप चांगली साथ दिलीस. खूप काळजी घेतलीस माझी. माझ्यावर आलेलं प्रत्येक संकट तू तुझ्या अंगावर घेतलस, सोडून जातानाही मी सोबत नसेन याची पूर्ण दक्षता घेतलीस. तू जाण्याची हलकी कुणकुण लागली होती, पण मी अगदी बेसावध असताना जाशील अस वाटलं नव्हतं. आज पुन्हा आलीस, नाव बदलून, NEXON .. पण मला माहित आहे, तू तीच आहेस, शरीर फक्त वेगळ आहे, मनाचं काय करशील!!!! या पुढेही अशीच साथ दे…’

सेलिब्रिटी रेसिपी: सुयश टिळक सांगतोय कशी करायची ‘कांद्याची करंजी’

सागरने नेक्सन ही कार घेतली असून त्याने पत्नी आणि मुलीसोबतचे फोटो आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 12:43 pm

Web Title: chala hawa yeu dya fame sagar karande bought new car nexon
Next Stories
1 बच्चन कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी
2 TOP 10 NEWS : केआरकेने आमिरशी घेतलेल्या पंग्यापासून ते दीपिकाच्या नाराजीपर्यंत सर्वकाही एका क्लिकवर
3 सेलिब्रिटी रेसिपी: सुयश टिळक सांगतोय कशी करायची ‘कांद्याची करंजी’
Just Now!
X