24 February 2021

News Flash

चला हवा येऊद्याच्या मंचावर ‘देवमाणूस’ची चर्चा; सरु आजींनी केला रॉकिंग परफॉर्मन्स

सरू आजींनी केलाय एक रॉकिंग परफॉर्मन्स

गेल्या ६ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा, त्यांना खळखळून हसायला लावणारा कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. आतापर्यंत या कार्यक्रमांच्या मंचावर अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. यात अनेकदा चित्रपट, मालिका यांचं प्रमोशन करण्यासाठी किंवा प्रेक्षकांशी थेट गप्पा मारण्यासाठीही कलाकार उपस्थित राहिले आहेत. यामध्येच आता छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या देवमाणूस आणि कारभारी लयभारी या मालिकेतील कलाकारांनी या मंचावर हजेरी लावली. विशेष म्हणजे ‘देवमाणूस’मधील कलाकारांनी या मंचावरदेखील प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं.

‘देवमाणूस’ या मालिकेतील सरू आजी आणि टोण्या या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांचं मनापासून मनोरंजन केलं आहे. त्यामुळे ही जोडी सध्या प्रेक्षकांमधील लोकप्रिय जोडी ठरत आहे. विशेष म्हणजे त्यांचा हाच मजेशीर अंदाज हवा येऊ द्याच्या मंचावरदेखील पाहायला मिळाला. यामध्येच सरू आजींनी एक रॉकिंग परफॉर्मन्स सादर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्यांच्यासोबत ‘देवमाणूस’ व ‘कारभारी लयभारी’ मालिकेतील कलाकारांनीदेखील धडाकेबाज पद्धतीने डान्स करत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे ‘हवा येऊ द्या चे’ हे मजेशीर भाग २१ ते २३ डिसेंबर रोजी प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 5:16 pm

Web Title: chala hawa yeu dya tv show devmanus actors and actress saru aaji dance performance ssj 93
Next Stories
1 ट्रोलिंगच्या विषयावर करीनाने मांडली स्पष्ट भूमिका म्हणाली…
2 “टीव्ही कलाकारांकडे बॉलिवूडमध्ये तुच्छतेनं पाहतात” अभिनेत्रीनं सांगितला ऑडिशनचा अनुभव
3 NCB करणार कारवाई? ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरु असताना अर्जुन रामपालने सोडला देश
Just Now!
X