29 May 2020

News Flash

थुकरटवाडीत येणार महेश मांजरेकर; साजरा होणार ‘भाईचा बर्थडे’

सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, संजय दत्त, सलमान खान यांच्या व्यक्तिरेखा या विनोदवीरांनी साकारल्या.

'चला हवा येऊ द्या'

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी ‘स्ट्रेस बस्टर’चे काम करतो. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. चला हवा येऊ द्या मध्ये मराठीच नाही तर बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या आगामी भागात महेश मांजरेकर येणार आहेत.

महेश मांजरेकर हे लोकप्रिय व्यक्तिमत्व महाराष्ट्राला नवीन नाही. एक ऑलराऊंडर कलाकार म्हणून महेश मांजरेकर यांना ओळखलं जातं आणि ते थुकरटवाडीत येणार म्हटल्यावर या विनोदवीरांनी एकच कल्ला केला. चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी महेश मांजरेकरांसाठी ‘भाईचा बर्थडे’ हे विनोदी स्किट सादर केलं ज्यात सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, संजय दत्त, सलमान खान यांच्या व्यक्तिरेखा या विनोदवीरांनी साकारल्या.

आणखी वाचा : ‘अग्निहोत्र २’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

जेव्हा थुकरट वाडीत महेशजींच्या म्हणजेच ‘भाईच्या बर्थडे’ साठी हे सुपरस्टार येतील तेव्हा प्रेक्षकांच्या घरी हास्यस्फोट होणार यात शंकाच नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 3:18 pm

Web Title: chala hawa yeu dya welcomes new guest mahesh manjrekar ssv 92
Next Stories
1 …. म्हणून यापुढे चित्रपटांमध्ये ‘आयफोन’चा करता येणार नाही वापर
2 ‘माझ्या नवऱ्याचं नंदिता दाससोबत अफेअर होतं’; ‘लगान’मधील अभिनेत्यावर पत्नीचा आरोप
3 ‘अग्निहोत्र २’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
Just Now!
X