छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे ही नावं आज साऱ्यांनाच ठावूक आहेत. मात्र, त्यांच्यासोबतच सध्या लोकप्रिय ठरत आहे तो अभिनेता म्हणजे अंकूर वाढवे. आपल्या उंचीविषयी जराही न्यूनगंड न बाळगता हा अभिनेता थेट आलेल्या संकटांना भिडला आणि आज लोकप्रिय झाला. विशेष म्हणजे अंकूर नुकताच बाबा झाला असून त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
‘चला हवा येऊ द्या’मध्ये कधी लहान मुलाची, तर कधी स्त्रीची भूमिका साकारत अंकूरने प्रेक्षकांचं मनापासून मनोरंजन केलं. त्यामुळे आज तो तुफान लोकप्रिय आहे. त्यातच आता त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. अंकूर आणि त्याच्या पत्नीला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.
View this post on Instagram
“कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो”, असं कॅप्शन देत त्याने त्याच्या चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. अंकूरने ही गोड बातमी शेअर केल्यावर त्याच्यावर चाहते व सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, अंकूर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय विनोदवीर आहे. चला हवा येऊ द्याच्या मंचावर त्याने चांगलीच धमाल उडवून दिली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 16, 2021 4:45 pm