भारतीय चित्रपटसृष्टीमधील काही अजरामर चित्रपटांच्या नावाच्या यादीत येणारा एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘शोले’. रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटाने आजवर विविध विक्रम प्रस्थापित केले आहेत. फक्त विक्रमांपुरताच मर्यादित न राहता या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनातही कायमचे स्थान मिळवले. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. ‘जय-विरू’, ‘बसंती’, ‘गब्बर’ या पात्रांसोबतच बसंतीची धन्नोही अनेकांच्या स्मरणात राहिली. अशा या अजरामर चित्रपटातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे शोलेचे चित्रीकरण झालेले ते गाव… ‘रामगढ’.

रामनगर जिल्हा प्रशासन आणि कर्नाटक पर्यटन मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने रामगढ हे गाव पुनरुज्जीवित करण्यासाठीचा एक प्रस्ताव राज्य शासनदरबारी मांडण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये मांडण्यात आलेल्या आराखड्यानुसार, त्या गावात म्हणजे ‘रामगढ’मध्ये एक भव्य असे व्यासपीठ बांधण्यात येणार आहे. या व्यासपीठामुळे ‘रामगढ’ ३ डी स्वरूपात पाहता येईल. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा ‘शोले’मय आठवणींचा अनुभव घेता आला पाहिजे यासाठीच भव्य ३डी व्यासपीठाचा बेत आखण्यात आला आहे.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

त्यासोबतच ‘रामगढ’ची सैर करत असताना गावामध्ये प्रकाशयोजनेच्या सहाय्याने पूर्णपणे शोलेचा काळ जागा करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर ‘ये हात हमको दे दे ठाकूर’, ‘बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना’, ‘कितने आदमी थे’ हे आणि असे बरेच संवादही दर्शनीय भागात लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. सोशल मीडियामुळे ही संकल्पना उभी करण्यास फार मदत झाली आहे.

कर्नाटक-बंगळुरु पट्ट्यातील रामनगर येथील रामदेवरा टेकड्यांजवळील भागात ‘शोले’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या टेकड्यांचा काही भाग हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्यामुळे ‘रामगढ’ येथे हा प्रकल्प आकारास येणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या या प्रकल्पाविषयी चर्चा सुरु असून जर ही कल्पना यशस्वी झाली, तर पर्यटन क्षेत्रामध्ये आणखी एक क्रांतीकारक बदल घडल्याचे पाहायला मिळू शकेल.