News Flash

सलमान खानने मला मानधन द्यावे- चाँद नवाब

सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' प्रदर्शित झाला आणि पाकिस्तानाचा पत्रकार चाँद नवाब याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली

| July 26, 2015 12:42 pm

सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित झाला आणि पाकिस्तानाचा पत्रकार चाँद नवाब याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पाकिस्तानी पत्रकार असलेल्या चाँद नवाबच्या प्रत्यक्ष आयुष्यापासून ‘प्रेरणा’ घेऊन अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याने ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे. त्याबद्दल दिग्दर्शक कबीर खान व मुख्य अभिनेता सलमान खान यांनी आपल्याला मानधन द्यावे, असे चाँद नवाबने म्हटले आहे.
‘त्यांनी जर मानधन दिले; तर उत्तम बाब आहे. मात्र मानधन मिळाले नाही, तर काहीही समस्या नाही. या चित्रपटाच्या माध्यमामधून मला प्रसिद्धी मिळवून दिल्याबद्दल मी सलमान व खान यांचा आभारी आहे,’ असे नवाब यांनी सांगितले.  चाँद नवाबच्या या मागणीला सलमान काय उत्तर देतोय ते पाहणे मजेशीर ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2015 12:42 pm

Web Title: chand nawab hopes salman will pay him for bajrangi bhaijaan
Next Stories
1 ‘तरुण तुर्क..’ लवकरच रूपेरी पडद्यावर
2 ‘लोकांकिका’ ते थेट रुपेरी पडदा!
3 सूर- तालाच्या हिंदोळ्यावर
Just Now!
X