06 March 2021

News Flash

“मी भारतीय असल्यामुळे…”; अभिनेत्रीने सांगितला परदेशातील ‘तो’ धक्कादायक अनुभव

विदेशी चालकाच्या 'त्या' कृत्यामुळे अभिनेत्री ढसाढसा रडू लागली

पाश्चात्य देशांमध्ये सध्या वर्णद्वेषाविरोधात जोरदार आंदोलनं सुरु आहेत. अनेक नामांकित कलाकार या आंदोलनांमध्ये भाग घेत आहेत. अनेक जण वर्णद्वेषाबाबत त्यांना आलेले अनुभव सांगत आहेत. असाच काहीचा धक्कादायक अनुभव अभिनेत्री चांदनी भगवानानी हिने सांगितला आहे. केवळ भारतीय असल्यामुळे तिला बसमधून बाहेर काढण्यात आलं होतं.

अवश्य पाहा – उज्जैन पोलिसांकडून विकास दुबेला अटक; नेटकऱ्यांनी Memes मधून घेतली UP पोलिसांची फिरकी

चांदनीने एक व्हिडीओ ट्विट करुन हा अनुभव सांगितला आहे. करोनाचे संक्रमण होण्यापूर्वी ती ऑस्ट्रेलियामध्ये गेली होती. सध्या लॉकडाऊनमुळे ती तिथेच थांबली आहे. दरम्यान एकदा प्रवास करताना हा चकित करणारा अनुभव तिला आला.

अवश्य पाहा – “तुम्हीही सोडून गेलात?”; जगदीप यांच्या निधनामुळे ‘शोले’मधील अभिनेत्याला मानसिक धक्का

“सध्या मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. एकदा मी बसने प्रवास करत होते. त्यावेळी माझ्या लक्षात आलं, की कदाचित मी चूकीची बस पकडली आहे. मी क्रॉसचेक करण्यासाठी गुगल मॅपही पाहिला त्यामुळे मी आणखी गोंधळले. दरम्यान बस कुठल्या दिशेने जातेय हे जाणून घेण्यासाठी मी चालकाशी संपर्क साधला. परंतु त्याने मला काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो ऑस्ट्रेलियन प्रवाश्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. परंतु माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. हे पाहून मी संतापले व त्याला जाब विचारला. यावर उलट तो माझ्यावरच भडकला. मी केवळ भारतीय असल्यामुळे त्याला माझ्याशी चर्चा करायची नव्हती. त्याने मला शिवीगाळ करत थेट बसमधून खाली उतरवलं.”

चांदनी भगवानानी एक टीव्ही अभिनेत्री आहे. एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. या सुपरहिट मालिकेत तिने बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘अमिता का अमित’, ‘तुम्ही हो बंधु सखा तुम्ही’, ‘खिडकी’, ‘संतोषी माँ’ यांसारख्या काही मालिकांमध्ये काम केले. सध्या चांदनी अभिनयाचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 6:51 pm

Web Title: chandni bhagwanani faces racism in australia mppg 94
Next Stories
1 “तुम्हीही सोडून गेलात?”; जगदीप यांच्या निधनामुळे ‘शोले’मधील अभिनेत्याला मानसिक धक्का
2 भारतीय इकडे घरात अडकून; तिकडे सनी लिओनीची कुटुंबासहीत बीचवर धमाल
3 Video : “..अन् पैजेचा विडा चित्रपट मिळाला”
Just Now!
X