News Flash

‘इट चॅप्टर – २’: सात दिवसांत कमावले तब्बल *** कोटी रुपये

भारतातही या चित्रपटाने आश्चर्यचकित करणारी कमाई केली आहे.

बॉलीवुडचे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊन धडाधड कोसळत असताना गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेला अँड्रेस मुश्चेट्टी दिग्दर्शित ‘इट चॅप्टर – २’ हा चित्रपट जगभरातील तिकीटबारीवर धुमाकूळ घालतो आहे. भारतातही या चित्रपटाने १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जगभरातून या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या आठवड्यात ६५१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट टायटॅनिक आणि अवतार यांसारख्या सर्वाधीक कमाईचे केलेल्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवेल असे म्हटले जात आहे.

आजवर प्रदर्शित झालेल्या इतर भयपटांपेक्षा वेगळा असलेला ‘इट चॅप्टर – २’  हा ‘इट’ चित्रपट मालिकेतील दुसरा चित्रपट आहे. ही मालिका स्टीफन किंग यांच्या १९८६ सालच्या कादंबरीवर आधारीत आहे. ही कादंबरी जगभरात तुफान गाजली होती. आजवर सर्वाधीक वाचल्या गेलेल्या पुस्तकांच्या यादीत ही कांदंबरी तीसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या दिशेने खेचले गेले जात आहेत. आणि म्हणून पहिल्याच आठवड्यात त्यांना ६५१ कोटींचा आकडा पार करता आला. भारतातही या चित्रपटाने १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 4:54 pm

Web Title: chapter two earns 91 million dollars in first weekend mppg 94
Next Stories
1 ..म्हणून ‘टायटॅनिक’च्या कथेत दाखवला जॅकचा मृत्यू; अभिनेत्याचे उत्तर
2 सलमानच आहे… फक्त सातारचा आहे!
3 विसर्जनानंतर चौपाट्यांचे हाल; सोनाली बेंद्रेनं व्यक्त केली चिंता
Just Now!
X