शब्दांशिवाय चित्रपट किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिन. केवळ हातवारे आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या या महान विनोदवीराची आज १३१वी जयंती आहे. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत ‘शोल्डर आर्म’, ‘द फ्लोअर वॉकर’, ‘द रिंक’, ‘द फायरमॅन’, ‘पोलीस’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. परंतु त्यांचे हे पाच चित्रपट तुम्हाला इंटरनेटवर अगदी मोफत पाहाता येतील.

द गोल्ड रश – हा चित्रपट १९२५ साली प्रदर्शित झाला होता. सोन्याच्या शोधात निघालेल्या लोकांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट चार्ली चॅप्लिनच्या अफलातून विनोदामुळे सुपरहिट झाला होता. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

द सर्कस – हा चित्रपट १९२८ साली प्रदर्शित झाला होता. सर्कसमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपटाचे कथानक आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

द मॉर्डन टाईम्स – हा चित्रपट १९३६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पहिल्या औद्योगिक क्रांतीचे चित्रीकरण करण्यात आले आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

द किड – हा चित्रपट १९२१ साली प्रदर्शित झाला होता. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

द ग्रेट डिक्टेटर – हा चित्रपट १९४० साली प्रदर्शित झाला होता. जर्मनीचा हुकूमशाह अॅडोल्फ हिटलरवर टीका करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती चार्ली चॅप्लिन यांनी केली होती. हा त्यांच्या सिनेकारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

चार्ली चॅप्लिन कट्टर कम्यूनिस्ट विचारांचे होते असं म्हटलं जातं. त्यामुळे ७०च्या दशकात त्यांच्या चित्रपटांवर अमेरिकेने बंदी घातली होती. परंतु तरीही अफाट लोकप्रियतेच्या जोरावर १९७३ साली त्यांनी ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले होते.