05 July 2020

News Flash

‘चार्लिज एंजल्स’मधील लुसीला पुत्ररत्न

'चार्लिज एंजल्स' हॉलिवूडपटातील अभिनेत्री लुसी लियू हिला पुत्ररत्न प्राप्ती झाली असून, मुलाबरोबरचे छायाचित्र तिने इंन्स्टाग्रामवर शेअर केले.

| August 28, 2015 06:16 am

‘चार्लिज एंजल्स’ हॉलिवूडपटातील अभिनेत्री लुसी लियू हिला पुत्ररत्न प्राप्ती झाली असून, मुलाबरोबरचे छायाचित्र तिने इंन्स्टाग्रामवर शेअर केले. पहिल्यांदाच मातृसुख अनुभवत असलेल्या लुसीला सरोगसीद्वारे पुत्ररत्न प्राप्त झाले. आपण माता झाल्याचे सांगून ४६ वर्षीय लुसीने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. माझ्या आयुष्यात आलेल्या छोट्या नवीन पाहुण्याची ओळख करून देते, माझा मुलगा रॉकवेल लॉयड लियू, खूप सारे प्रेम, असा संदेश तिने इंन्स्टाग्रामवरील छोट्या रॉकवेल लॉयड लियूसोबतच्या छायाचित्रसह पोस्ट केला आहे. व्यावसायिक नोआम गोट्समॅन, अभिनेता विल मॅकॉरमॅक आणि लेखक-दिग्दर्शक झॅक हेल्म यांच्याबरोबर लुसीचे नाव जोडले गेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2015 6:16 am

Web Title: charlies angels star lucy liu welcomes son
Next Stories
1 हृतिककडून सोनमला टँगोचे धडे
2 जीवनप्रवासावरील पुस्तकासाठी महेश भटकडून अनु अग्रवालचे कौतुक
3 सलमानने ‘हिरो’ मधील ‘तो’ सीन हटवला
Just Now!
X