03 June 2020

News Flash

“या चित्रपटामुळे अनन्या होईल देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री”; निर्मातीचा अजब दावा

चार्मी कौर अनन्याला करणार देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या बॉलिवूडमधील चर्चेत असलेले नाव आहे. अनन्याच्या अभिनयावरुन अनेकदा तिची खिल्ली उडवली जाते. तिला फिल्म फेअर पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांनी या पुरस्कारावरच प्रश्न उपस्थित केले होते. परंतु ‘फायटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर टीकाकारांची बोलती बंद होईल असा दावा चार्मी कौर हिने केला आहे. फायटर चित्रपटामुळे अनन्याला भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळेल असही ती म्हणाली.

अवश्य पाहा – “भीतीचा खेळ थांबवा लॉकडाउन उठवा”; अभिनेत्याची सरकारकडे मागणी

 

View this post on Instagram

 

In 2 weeks , u will feel it . In 4 weeks , u will c it . In 6 weeks , u will hear it . #motivated Original Needs #nofilter

A post shared by Charmmekaur (@charmmekaur) on

अवश्य पाहा – आणखी एका ‘पॉर्नस्टार’ची बॉलिवूडमध्ये एण्ट्री; राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात करणार काम

अनन्या पांडे फायटर या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाची निर्माती चार्मी कौर हिने बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत अनन्याच्या अभिनयाची प्रचंड स्तुती केली. “अनन्या एक उत्तम अभिनेत्री आहे. तिला केवळ चांगल्या पटकथांची गरज आहे. ‘फायटर’ हा चित्रपट प्रदर्शित होताच ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणार आहे. तिला भारतातील सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन अभिनेत्रींच्या यादीद स्थान मिळेल ही मला खात्री आहे. असा दावा चार्मीने केला.”

चार्मी कौर ही एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. सध्या ‘फायटर’ या चित्रपटाची निर्माती म्हणून ती काम करत आहे. या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडा मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. अनन्या पांडे या चित्रपटात त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 1:38 pm

Web Title: charmme kaur ananya panday fighter op 3 actresses in india mppg 94
Next Stories
1 चित्रपट कर्मचाऱ्यांनी ठोठावला सरकारचा दरवाजा; मागितली काम करण्याची परवानगी
2 अरे बापरे, हे काय झालं?? अनुष्काच्या घरात शिरला डायनॉसोर, व्हिडीओ केला शेअर
3 Video : पोलिसांना ‘वंदे मातरम’मधून मानाचा मुजरा
Just Now!
X