News Flash

Koffee With Karan Season 6 Promo : सेलिब्रिटींना करावा लागणार करणच्या चुकीच्या प्रश्नांचा सामना 

सेलिब्रिटी त्याच्या या अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं देतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

करण जोहर, karan johar

चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनासोबतच सूत्रसंचालनाच्या क्षेत्रातही निर्माता- दिग्दर्शक करण जोहर चांगलाच प्रकाशझोतात असतो. त्याच्या संवादकौशल्याविषयी काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमधून तर करणची वेगळीच आणि धमाल बाजू सर्वांसमोर आली आहे. अशा या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या शोचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे.

नुकताच कॉफी विध करणच्या सहाव्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. खुद्द करणनेही तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सेलिब्रिटी पाहुण्यांना विचारण्यात येणारे वेडेवाकडे प्रश्न, त्यातून होणाऱ्या चर्चा आणि त्यानंतरचे परिणाम या सर्व गोष्टींना अधोरेखित करत हा प्रोमो साकारण्यात आला आहे.

वाचा : काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट

चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या मंडळीमसमोर आपल्याला एखादा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर नेमकी कशी तारांबळ उडते आणि प्रश्न विचारणारा कशा प्रकारे उत्तराची आस लावून बसलेला असतो, याचं धमाल चित्रण या अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलं आहे. तेव्हा आता २१ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात येणाऱ्या सेलिब्रिटींनी करण नेमके कोणते प्रश्न विचारतो आणि त्याच्या या अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं देतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 1:42 pm

Web Title: chat show koffee with karan season 6 promo watch video karan johar
Next Stories
1 वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रियांकाला अस्थमाचा त्रास
2 डॉल्फिनसोबत फोटो काढणं त्रिशाला पडलं महाग
3 ..म्हणून वडिलांनाही वेळ देऊ शकत नाही जान्हवी
Just Now!
X