देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर भाष्य करणाऱ्या ‘चीट इंडिया’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये इमराम हाश्मी मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचा सहनिर्मातासुद्धा तोच आहे. तर ‘गुलाब गँग’चे दिग्दर्शक सौमिक सेन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

‘मेरा नाम राकेश सिंह है, उपरवाला दुआ कबूल करता है, मै सिर्फ कॅश लेता हूँ,’ या संवादाने टीझरची सुरुवात होते. जवळपास एक मिनिटाच्या या टीझरमध्ये शिक्षणव्यवस्थेत कशाप्रकारे भ्रष्टाचार चालतो, हे दाखवण्यात आलं आहे.

‘गेल्या काही दिवसांत मी वाचलेल्या पटकथांपैकी ‘चीट इंडिया’ची पटकथा दमदार आहे. यामध्ये मी साकारत असलेली भूमिका माझ्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट असेल,’ असं म्हणत इमरानने सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा केली होती. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bharat first look: वाघा बॉर्डरवर सलमान- कतरिना

चित्रपटासंदर्भात दिग्दर्शक सौमिक सेन म्हणाले की, ‘सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तणावाखाली असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि भारतीय तरुणांसाठी हा चित्रपट आहे.’ इमरान हाश्मी फिल्म्स, टी सीरिज, आणि एलिप्सिस एंटरटेन्मेंट निर्मित ‘चीट इंडिया’मध्ये इमरानसोबतच आणखी कोणाच्या महत्त्वाच्या भूमिका असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.