05 July 2020

News Flash

पाहा: ‘अझर’च्या जीवनावरील चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लूक, इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या जीवनावर आधारित 'अझर' या बॉलीवूड चित्रपटात अभिनेता इम्रान हाश्मी अझरची मुख्य भूमिका साकारत आहे.

| May 21, 2015 03:12 am

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या जीवनावर आधारित ‘अझर’ या बॉलीवूड चित्रपटात अभिनेता इम्रान हाश्मी अझरची मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यामध्ये अझरच्या एकूण व्यक्तिमत्वाची झलक स्पष्टपणे दिसत आहे. फलंदाजी करत असताना मोहम्मद अझरूद्दीन वापरत असलेले पांढऱ्या रंगाचे हेल्मेट आणि अझरप्रमाणे गळ्यात ताईत घातलेला इम्रान हाश्मी पोस्टरमध्ये दिसत आहे. एकुणच हा पोस्टर चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवणारा आहे.  ‘अझर’ हा चित्रपट खेळावर आधारित असला तरी या चित्रपटातून अझरूद्दीन यांच्या आयुष्यावर जास्तीत जास्त प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे इम्रान हाश्मीने सांगितेल. या चित्रपटासाठी माहिती गोळा करताना खुद्द अझरूद्दीन यांच्याशी भेटून त्यांच्याकडून त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी जाणून घेतल्या आहेत. अझरुद्दीन यांच्या जीवनप्रवासावर नजर टाकल्यास त्यांचे आयुष्य अनेक रोमांचक घटनांनी भरलेले असल्याचे दिसून येईल, असेही इम्रानने सांगितले. अवघ्या दोन-अडीच तासांत त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास पडद्यावर मांडणे अवघड आहे. त्यामुळे आम्हाला चित्रपटाची आखणी करताना बरीच मेहनत करावी लागली. मात्र, या चित्रपटामुळे आपली कारकीर्द नव्या उंचीवर जाऊन पोहचेल, असा विश्वासही इम्रान हाश्मी याने व्यक्त केला. 

CFggMRrUgAIldB7

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2015 3:12 am

Web Title: check out the first look from azhar starring emraan hashmi
Next Stories
1 ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’मध्ये माधुरी दिक्षित
2 ‘अगं बाई अरेच्चा २’ का पाहाल याची कारणे..
3 ‘अगं बाई अरेच्चा २’ला पहिली दाद राजकुमार हिरानींची
Just Now!
X