भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. हरभजन आणि गीताच्या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू असून या सोहळ्याला उपस्थित राहणाऱया पाहुण्यांसाठी खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. तीन देशांचे शेफ या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱया भोजन समारंभात विविध पदार्थ तयार करणार आहेत. एकूण पाच दिवसांच्या या समारंभात लंडन, जर्मनी आणि फ्रान्स या तीन देशांतून आलेले शेफ १५० हून अधिकप्रकारचे पदार्थ तयार करणार आहेत.

लग्नासाठी हरभजनची साध्या पण आकर्षक पोशाखास पसंती

दरम्यान, जालंधरपासून २० किमी अंतरावर असलेल्या फगावाडा हॉटेलमध्ये आज हरभजन, गीता यांचा मेहंदीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात हरभजनने आपल्या भांगडा नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २९ ऑक्टोबरला विवाह पार पडल्यानंतर १ नोव्हेंबरला दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या स्वागतसमारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.