News Flash

अमिताभ यांचा आगामी चित्रपट अडचणीत

अलिकडेच या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण झाले.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा ‘चेहरे’ हा थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे यांची केमिट्री पाहाण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. हा चित्रपट २४ एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु प्रेक्षकांना आता आपली उत्सुकता आणखी ताणावी लागणार आहे. कारण निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख आणखी चार महिने पुढे ढकलली आहे. ‘चेहरे’ आता येत्या १७ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

अवश्य वाचा – प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.. पाहा भारत वि. जपान सामन्याची चित्रमय झलक

अवश्य वाचा – हे कलाकार साकारणार ’83’ च्या विजयाचे शिल्पकार

चेहरे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे का ढकलली याबाबत निर्मात्यांनी अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. मात्र काही आर्थिक कारणांमुळे निर्मात्यांना हे पाऊल उचलावे लागल्याचे म्हटले जात आहे.

चेहरे हा एक थरारपट आहे. अलिकडेच या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण झाले. रुमी जाफरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या कथानकाबाबत कुठल्याच कलाकाराने कोणत्याही प्रकारचे भाष्य अद्याप केलेले नाही. परंतु रुमी जाफरी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एका पैसा वसूल चित्रपटाची निर्मिती केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रेक्षक आता हा चित्रपट पाहाण्यासाठी आणखी उत्साही झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 7:46 pm

Web Title: chehre amitabh bachchan emraan hashmi film postponed mppg 94
Next Stories
1 स्वराज्याच्या पर्वाची चाहूल ‘जिऊ’; लवकरच रुपेरी पडद्यावर
2 भुतांमागचे हात
3 सुशांत सिंग रजपूतची नवी गर्लफ्रेंड? फोटो झाला व्हायरल
Just Now!
X