05 March 2021

News Flash

Don’t underestimate the power of… ‘चेन्नई एक्स्प्रेस’ स्टाइलने पोलिसांचा संदेश

पोलिसांनी राज्यातील लोकांना दिला खास संदेश

देशभरातील लोक सध्या करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंस ठेवण्याचा म्हणजेच एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र असे सांगून सुद्धा राज्यातील जनता गर्दी करण्याचे काही कमी करत नाही. अशा लोकांना सोशल डिस्टंसचे महत्व पुन्हा एकदा समजवण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाच्या पोस्टरचा वापर केला आहे.

अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या चेन्नई एक्सप्रेस या सुपरहिट चित्रपटाचे पोस्टर नागपूर पोलिसांनी ट्विट केले आहे. या पोस्टरमध्ये एकमेकांपासून दूर बसलेले शाहरुख आणि दीपिका दिसत आहेत. “सोशल डिस्टंसच्या शक्तीला कमी समजू नका” अशा आशयाची कॉमेंट या फोटोवर करण्यात आली आहे.

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी चक्क हॅरी पॉटर या चित्रपटातील एक दृश्य ट्विट केले होते. “एप्रिल फूलच्या नावाखाली सोशल मीडियावर अफवा पसरवू नका. कारण आमचं तुमच्यावर लक्ष आहे.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 5:07 pm

Web Title: chennai express nagpur police coronavirus mppg 94
Next Stories
1 सलमान लग्न कधी करणार? कतरिनाने दिले उत्तर, व्हिडीओ व्हायरल
2 पाच पैसे देऊन आयएएस ऑफिसर पाहायचे महाभारत, महाभारतातील कृष्णाने सांगितल्या जुन्या आठवणी
3 …तर आपल्याला थाळ्याच वाजवत बसावं लागेल; अनुराग व्यक्त केली भीती
Just Now!
X