News Flash

राजस्थानमधील राजकीय घडामोडींवर चेतन भगत यांचा उपरोधिक टोला; म्हणाले…

"विनाशकाले विपरीत बुद्धी"

राजस्थानमध्ये सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण फडकवून आपल्याच सरकारला आव्हान दिलं आहे. परिणामी काँग्रेस सरकारने त्यांना उपमुख्यमंत्री पदावरुन हटवलं आहे. या राजकीय घडामोडींवर प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणत त्यांनी सरकारला उपरोधिक टोला लगावला आहे.

अवश्य पाहा – आलिया भट्टच्या बहिणीला बलात्कार व जीवे मारण्याची धमकी; करणार कायदेशीर कारवाई

अवश्य वाचा – टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल

“कदाचित भाजपा एका मजबुत काँग्रेस पक्षाची इच्छा व्यक्त करतेय. पण कुठल्याही स्पर्धेशिवाय मजा येत नाही. एका बॉक्सिंग मॅचची कल्पना करा जिथे एक स्पर्धक स्वत:लाच ठोसे मारतोय.” अशा आशयाचे ट्विट चेतन भगत यांनी केले आहे. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केले. “विनाशकाले विपरीत बुद्धी, एखादं मोठं संकट येण्यापूर्वी आपण अशाच प्रकारचे चुकीचे निर्णय घेतो.” असं म्हणत त्यांनी राजस्थानमधील राजकारणावर उपरोधिक टोला लगावला आहे. चेतन भगत यांचे हे दोन्ही ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सचिन पायलट यांनी त्यांना २५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे १०७, भाजपाचे ७२ आमदार आहेत. त्याशिवाय १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अशोक गेहलोत यांनी केला आहे. राजस्थानात २०१८ मध्ये काँग्रेस सत्तेवर आली, तेव्हापासूनच सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झाला. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्याजागी अशोक गेहलोत यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हाच सत्ता संघर्षाची बीजं रोवली गेली. काँग्रेस राजस्थानात सत्तेवर आली, तेव्हा सचिन पायलट प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख होते. प्रदेशाध्यक्ष या नात्याने राजस्थानात काँग्रेसला सत्तेवर आणण्यात आपला प्रमुख वाटा आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:59 pm

Web Title: chetan bhagat comment on rajasthan politcal crisis mppg 94
Next Stories
1 न्यू जर्सीमध्ये पहिल्यांदाच मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन
2 सोनू सूद करणार अपघातग्रस्त ४०० मजुरांची मदत; प्रशासनाकडे मागितली माहिती
3 ‘आता तुझा फोनही येणार नाही’; सुशांतच्या आठवणीत ‘दिल बेचारा’चे दिग्दर्शक भावूक
Just Now!
X