लेखक चेतन भगतच्या कांदबरी या तरूणवर्गामध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्याच्या अनेक कांदबरीवर आधारित चित्रपटही आलेत. विशेष म्हणजे कांदबरी इतकेच हे चित्रपटही बॉक्स ऑफिवर चांगलेच चालले. आता लवकरच चेतन भगतची ‘The Girl in Room No 105’ ही कादंबरी प्रकाशित होणार आहे.

पण ही कांदबरी प्रकाशित होण्यापूर्वी तिच्यावर चित्रपटही येणार अशा चर्चा आहेत. याबद्दल अनेक वाचकांनाही कुतूहल आहे. पण जर कांदबरीला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला तर यावर नक्कीच चित्रपटदेखील येईल असं सांगत चेतननं चाहत्यांना आश्वस्त केलं आहे. याआधी चेतनच्या, ‘वन नाईट अॅट कॉल सेंटर’, ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’, ‘टु स्टेट’ , ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कांदबरीवर आधारित चित्रपट आले आहेत.

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Samantha Ruth Prabhu in atlees upcoming film with south star allu arjun
ब्रेकनंतर समांथा रुथ प्रभू अ‍ॅटलीच्या चित्रपटातून करणार पुनरागमन; ‘हा’ सुपरस्टार असणार मुख्य भूमिकेत
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

‘मी चित्रपटासाठी केवळ कांदबरी लिहितो असा अनेकांचा समज आहे. मात्र चांगली कांदबरी असेल तर तिच्यावर आधारित चित्रपट येणारच हे सध्याचं समीकरण आहे त्यामुळे ‘The Girl in Room No 105’ ही कांदबरी जर वाचकांच्या पसंतीस उतरली तर नक्कीच एखादा दिग्दर्शक त्यावर आधारित चित्रपट तयार करण्याचा विचार करेल असं चेतन ‘ दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या कादंबरीचा ट्रेलरही नुकताच लाँच करण्यात आला आहे.