करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. एक-एक करत करोनाग्रस्तांची संख्या आता दोन लाखांच्या घरात पोहोचण्याची चिन्हे आहेत. यावरुन प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी एक ट्विट केलं आहे. करोनाग्रस्तांची संख्या वाढतेय परंतु पाणी पुरीचं दुकान कधी सुरु होणार? हा प्रश्न त्यांनी विचारला आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी भारतीय लोकांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले चेतन भगत?

दोन महिन्यांपूर्वी
बातम्या – एक हजार करोनाग्रस्त – एकूण २० हजार केसेस
भारतीय लोक – अरे नाही, एक हजार करोनाग्रस्त – एकूण २० हजार केसेस?
आत्ताची परिस्थिती
बातम्या – १० हजार करोनाग्रस्त – एकूण दोन लाख केसेस
भारतीय लोक – अच्छा ठिक आहे, पण पाणी पुरीचं दुकान कधी सुरु होणार?

अशा आशयाचे ट्विट चेतन भगत यांनी केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय लोकांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. सुरुवातील केसेस कमी होत्या. तेव्हा लोक गंभीर प्रतिक्रिया देत होते. पण आता करोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. मात्र देशवासीय करोना सारख्या प्राणघातक विषाणूकडे फारसं गांभिर्याने पाहात नाहीत. हे फारच धोकादायक ठरु शकतं. अशा प्रकारचा संदेश चेतन भगत यांनी या ट्विटव्दारे दिला आहे.

चेतन भगत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते आपली प्रतिक्रिया देत असतात. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.