प्रसिद्ध लेखन चेतन भगत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. देशातील करोना लसीच्या तुडवड्यावरून चेतनने सरकरावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वीच चेतनने भारतात फायझर आणि मॉर्डना सारख्या उत्तम लसींची आयात का केली जात नाही ? असा सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली होती. चेतनच्या या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली होती. यावरून अभिनेत्री कंगना रणौतसह अनेक नेटकऱ्यांनी चेतनला ट्रोल देखील केलं.

ट्रोलर्सचा सामना केल्यानंतरही चेतन भगत शांत राहिलेला नाही. चेतने पुन्हा एकदा एक ट्विट करत सरकरारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणं गरजेचं असल्याचं म्हंटलं आहे. चेतनचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे. या ट्वीटमुळे काही नेटकऱ्यांनी चेतनला पुन्हा ट्रोल केलंय.
या ट्विटमध्ये चेतन म्हणाला, “लसीच्या प्लॅनबद्दल विचारत रहा. किती लस? कोणत्या तारखेला? 31 मे, 30 जून आणि 31 जुलै पर्यंत किती टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालं? याचे खरे आकडे?” असं म्हणत आपण सरकारला लसीकरणाबद्दल वारंवार प्रश्न विचारत राहणं गरजेचं असल्याचं चेतन म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ” मला शिवीगाळ करा, मला ट्रोल करा, माझ्या कामाचा तिरस्कार करा, माझ्या हेतूवर शंका घ्या, माझी थट्टा करा. मात्र माझ्या देशाच्या फायद्यासाठी लसीच्या योजनेबद्दल विचारत रहा” असं आवाहन चेतनने त्याच्या टिव्टमध्ये केलंय.

चेतनच्या या ट्विटवर काही नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा देत प्रश्न उभे करणं गरजेचं असल्याचं म्हंटलं आहे. चर काही नेटकऱ्यांनी मात्र त्याला चांगलचं ट्रोल केलंय. एक युजर म्हणालाय, “काय उपयोग IIM चा तू गुगल करत नाहिस का?

बॉलिवूड अभिनेते दिलिप ताहिल यांच्या मुलाला अटक, ड्रग्स खरेदी केल्याप्रकरणी ध्रुव ताहिलवर कारवाई

तर दुसरा युजर म्हणालाय, ” कृपा सरून सरकारच्या वेब साईटला भेट दे तिथे सर्व माहिती उपलब्ध आहे.”

चेतन भगतच्या या ट्विटनंतर अनेक नेटकऱ्यांनी तर लसीकरणाच्या आकडेवारीची माहिती शेअर केली आहे. या आधी देखील चेतनने एक ट्विट केलं होतं. यात तो म्हणाला होता. आयात करून किंवा देशात निर्मिती करून पण पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध झालीच पाहिजे.

चेतन भगतने ‘टू स्टेटस्’, ‘हाफ गर्लफ्रेण्ड’, “वन नाइट एट द कॉल सेण्टर”, ‘थ्री मिस्टेकस् ऑफ लाईफ’ अशी तरुण वर्गाच प्रसिद्ध असलेली पुस्तकं लिहिली आहेत. यावरून ‘टू स्टेटस्’, ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ हे सिनेमा देखील आले आहेत.